Nana Patole-Eknath shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde Reply Nana Patole : मी काम करणारा कार्यकर्ता, नॉट रिचेबल राहणारा कार्यकर्ता नव्हे; मुख्यमंत्र्यांचे पटोलेंना उत्तर

Chief Minister Satara Tour : दरे गावात आल्यानंतर माझा जनता दरबार भरतो. सातारा जिल्ह्याबरोबरच आसपासच्या जिल्ह्यातील लोकही त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे येत असतात. त्यांची काम तत्काळ होऊन जातात.

Vijaykumar Dudhale

Satara, 01 June : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्या वेळी त्यांनी शेतातील बांधावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना फोन लावला होता. मात्र, त्यांचे फोन नॉट रिचेबल होते, असे पटोले यांनी म्हटले होते. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिले असून ‘मी काम करणारा कार्यकर्ता आहे; मी नॉट रिचेबल राहणारा कार्यकर्ता नाही’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) म्हणाले, नाना पटोले (Nana Patole) हे आमचे चांगले मित्र आहेत. मी माझ्या सातारा (Satara) जिल्ह्यातील दरे गावी आल्यानंतर नुसता आराम करत नाही. दरे गावात आल्यानंतर माझा जनता दरबार भरतो. सातारा जिल्ह्याबरोबरच आसपासच्या जिल्ह्यातील लोकही त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे येत असतात. त्यांची काम तत्काळ होऊन जातात. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि सचिव यांच्याशी फोनवर बोलून काही कामं होऊन जातात. ते माझं काम चालूच असतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझ्याबरोबर सर्व अधिकारीही आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचे काम चालू असतं. दरे गावी आल्यानंतर बुलाडाणा दौरा केला, त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नगर जिल्ह्यातील चौंडी येथील कार्यक्रमाला गेलो. त्यामुळे गावी आल्यानंतर मी केवळ आराम करत नाही. मला कुठं इथं आराम करू दिला जातो.

दरे गावी सगळी लोकं येतात, मला भेटतात. मुख्यमंत्री गावी आले आहेत, आमचं काम होईल, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे मी काम करणारा कार्यकर्ता आहे, मी नॉट रिचेबल राहणारा कार्यकर्ता नाही. नाना पटोले यांनाही माझे काम माहिती आहे. विरोधी पक्षात असल्यामुळे काही गोष्टी बोलाव्या लागतात, त्यानुसार त्यांनी हे विधान केले असावे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT