Vijay Wadettiwar : 'मराठवाड्यात भीषण दुष्काळ असताना कृषिमंत्री शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून पळाले...'

Dhananjay Munde Tour : सध्या खरीप हंगाम तोंडावर असताना आणि पावसाळा जवळ आलेला असताना मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री खरीप नियोजन आढावा बैठका घेतात. पण, त्या बैठकांचा अजूनही पत्ता नाही.

Vijay Wadettiwar-Dhananjay Munde
Vijay Wadettiwar-Dhananjay MundeSarkarnama

Nagpur, 01 June : मराठवाड्यात भीषण दुष्काळ असताना तसेच खरीप हंगाम तोंडावर असताना राज्याला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषिमंत्री धनंजय मुंडे हे बाहेर पळाले आहेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला.

मराठवड्यात दुष्काळाची तीव्रता मोठी असताना कृषिमंत्री बाहेर गेले आहेत, त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी तिखट शब्दांत भाष्य केले आहे. कृषिमंत्री बाहेर असताना आयुक्तांची बदली होते. पूर्णवेळ सचिव नसतो. सध्या खरीप हंगाम तोंडावर असताना आणि पावसाळा जवळ आलेला असताना मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) खरीप नियोजन आढावा बैठका घेतात. पण, त्या बैठकांचा अजूनही पत्ता नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात खतांचा तुटवडा असून बियाणांचे दर 38 टक्क्यांनी वाढले आहेत. बियाणांसाठी शेतकऱ्यांना रखरखत्या उन्हात रांगेत उभं राहावं लागत आहे. खरीप नियोजनाचा आढावा घेऊन परिस्थितीवर उपाय योजना करण्याची गरज असताना हे सर्व गायब आहेत, याचाच अर्थ त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. कारण त्यांना शेतकऱ्यांप्रति काहीही देणंघेणं नाही. हीच त्यांची शेतकऱ्यांबद्दलची अनास्था दिसून येत आहे, असेही विरोधी पक्षनेते म्हणाले.

मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा तीव्र आहेत. पाणी आणि चारा टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. त्याच पद्धतीने विदर्भातील काही जिल्ह्यांतही पाणी टंचाई जाणवत आहे. पाण्याअभावी फळबागा वाळून जात आहेत. वादळी वाऱ्यामुळे घरं जमीनदोस्त झाली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीचे पाऊस विदर्भातील शेतकऱ्यांना अजूनही मिळालेले नाहीत, असा दावाही त्यांनी केला.


Vijay Wadettiwar-Dhananjay Munde
Narayan Rane : भाजप नेते म्हणतात महाराष्ट्रात 45+ जागा जिंकणार; राणे म्हणतात ‘नो कॉमेंटस’

वडेट्टीवार म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना विहिरी मिळाल्या आहेत, त्या विहिरीचे चार लाख रुपये कर्जखात्यात वळते करण्याचे काम विदर्भात सरकारकडून झाले आहे. विहिरीचे कामही अपुरे राहणार आहे, असा नतदृष्टपणा या सरकारने केला आहे. शेतकरी मेला काय आणि जिवंत राहिला काय, या सरकारला त्यांचे काहीही देणंघेणं नाही.

प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार नागपूर काँग्रेस कमिटीची बैठक आज (ता. 01 जून) झाली. सुनील केदार आणि नितीन राऊत हे बाहेरगावी असल्याने ते येऊ शकले नाहीत. लोकसभेच्या निकालानंतर पाच तारखेनंतर आमच्या कमिटीचा दौरा आम्ही ठरवणार आहोत. ज्या भागात दुष्काळाची तीव्रता मोठी आहे, अशा भागात दौरे करून त्याचा अहवाल आम्ही प्रदेश काँग्रेस कमिटी आणि राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.


Vijay Wadettiwar-Dhananjay Munde
Solapur Politics : सातपुतेंना सोलापूर शहर उत्तरमधून किती लीड मिळणार?; देशमुखांच्या आकड्याने भाजप नेत्यांची धाकधूक वाढणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com