Shambhuraj Desai
Shambhuraj Desai  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Elections : मुख्यमंत्र्यांची सूचना अन्‌ प्रचार संपण्याआधी काही मिनिटे पोहचून शंभूराज देसाईंनी ठोकले भाषण

संभाजी थोरात

कोल्हापूर : राज्यातील सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. यासाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. ग्रामपंचायतची निवडणूक यावेळी सर्वांनीच प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे थेट कॅबिनेट मंत्री प्रचारात उतरले आहेत.

राज्याचे शेवटचे टोक असलेल्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिनोळी गावात राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) पोहोचले आणि आपल्या पक्षासाठी मतदान करण्याचे आवाहन केले (Gram Panchayat Elections)

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील शिनोळी हे शेवटचे गाव शिनोळीनंतर कर्नाटकची हद्द लागते. अतिशय दुर्गम असलेलं हे गाव अवघ्या तीन हजार लोकसंख्येचं आहे. या गावातील ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीने होत आहे. येत्या १८ तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे. या गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पॅनल उभं केलं आहे.

या पॅनलला ताकद द्या, गावात जाऊन सभा घ्या, अशी सूचना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना दिली. आचारसंहितेमुळे प्रचाराची वेळ संपायच्या अगोदर काही मिनिटं शंभूराजे यांनी या ठिकाणी प्रचाराचे भाषण केलं. या गावातील सर्व समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः समर्थ असल्याची ग्वाही देसाई यांनी दिली.

दरम्यान, देसाई यांच्या सभेमुळे येथील कार्यकर्त्यांच्या बळ आलं. मात्र थेट कॅबिनेट मंत्री ग्रामपंचायतीच्या प्रचारात उतरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राज्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आता २० डिसेंबरला कोणत्या पक्षाच्या सर्वाधीक ग्रामपंचायती निवडून येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT