Gram Panchayat Elections : राज्यातील सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. यासाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये राज्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोण कोणाच्या विरोधात बाजी मारणार हे २० डिसेंबरला पाहायला मिळणार आहे. यंदा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी गटातटाच राजकारण पाहायला मिळालं. तर काही ठिकाणी एका घरातील दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असलेले पाहायला मिळाले. एवढंच नव्हे तर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच देखील या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. राज्यातील प्रमुख पक्षांनी आपल्या विजारांचा सरपंच ग्रामपंचायतीवर निवडून आणण्यासाठी कसून प्रयत्न केला.
दरम्यान, राज्यात सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान (voting) होणार आहे तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला प्रचार आज अखेर थंडावला आहे. (Gram Panchayat Elections)
कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींची निवडणूक? (७,७५१)
जळगाव-१४०, जालना-२६६, कोल्हापूर-४७५, लातूर-३५१, नागपूर- २३७, नंदुरबार- १२३, उस्मानाबाद- ११६, पालघर- ६३, परभणी- १२८, पुणे- २२१, वाशीम- २८७, यवतमाळ- १००, सोलापूर- १८९, ठाणे- ४२, वर्धा- ११३, नांदेड- १८१, नाशिक- १९६, सांगली- ४५२, सातारा- ३१९, सिंधुदुर्ग- ३२५, रायगड- २४०, रत्नागिरी- २२२, अकोला- २६६, अमरावती- २५७, अहमदनगर- २०३, औरंगाबाद- २१९, गोंदिया- ३४८, हिंगोली- ६२, बीड- ७०४, भंडारा- ३६३, बुलडाणा- २७९, चंद्रपूर- ५९, धुळे- १२८, गडचिरोली- २७.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.