महाबळेश्वर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करणे महाबळेश्वर भाजप तालुकाध्यक्षाला महागात पडले आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गुजर यांनी पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असुन महाबळेश्वर पोलिसांनी भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर विष्णु बिरामणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महाबळेश्वर भाजप तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी होईल असा फोटो शेअर केला. ही बाब येथील शिवसेनेच्या पदाधिकारी यांना समजताच शिवसैनिकांत खळबळ उडाली. शिवसेनेचे पदाधिकारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले. यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजेश कुंभारदरे, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे, शिवसेना शहर प्रमुख महेश गुजर, विजय नायडु, जितेश कुंभारदरे, बापु शिंदे, चंद्रकांत पांचाळ, राजु पंडीत, सचिन गुजर यांचा समावेश होता.
शिवसैनिकांनी दुरध्वनीवरून मधुकर बिरामणे यांच्याशी संपर्क साधला. याबाबत जाब विचारला असता त्यांनी तातडीने फेसबुक पेजवरून ती आक्षेपार्ह पोस्ट डिलिट केली. परंतु याने शिवसैनिकांचे समाधान झाले नाही. त्यांनी बिरामणे यांचा निषेध करून महाबळेश्वर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात कलम 500 नुसार भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.