War practice sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Earthquake Rumor: भूकंप म्हणून नागरिक घराबाहेर पळाले, पण खरं कारण वेगळंच!

राजेंद्र त्रिमुखे

Nagar News : बुधवारी रात्री पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक भूकंप सदृश्य धक्के जाणवू लागले .घराच्या खिडक्या, दरवाज्यांचा या धक्क्याने आवाज येऊ लागला. धक्के जाणवणाऱ्या गावातील नागरिक घाबरून घराबाहेर पळाले. सगळे वातावरणच भीतीचे तयार झाले. सोशल माध्यमातून ही माहिती काही वेळात सगळीकडे पसरली. आणि मग प्रशासनाला पण जाग आली. प्रशासनाकडून खरे कारण समोरे आले आणि सगळ्यांच्याच जीवात जीव आला.

पारनेर तालुक्यातील टाकली ढोकेश्वर, कान्हूर पठार, सारोळा अडवाइ गाव परिसरात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास काही मिनिटे हे भूकंप सदृश धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यात घराच्या खिडक्या दरवाजे वाजू लागल्याने लोकांनी घराबाहेर येऊन थांबणे पसंत केले.दरम्यान, ज्येष्ठ आणि जाणकार मंडळींनी अंदाज बांधत या गावांच्या जवळच असलेल्या लष्कराच्या के.के.रेंज येथे युद्ध सारव सुरू असल्याने येथे आवाज झाला असावा, असा अंदाज बांधत नागरिकांना धीर दिला.

दरम्यान प्रशासनापर्यंत ही माहिती पोहचताच पारनेरचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांना नागरिकांकडून माहिती घेतली. तसेच पारनेर प्रशासनाने जिल्हा प्रशासन,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून माहिती घेतली. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेकडे कुठलेही धक्के बसल्याची नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय लष्कराच्या युद्ध सराव के.के.रेंज या क्षेत्रात सुरू आहे. या सरावावेळी टँक मधून फायर केले जातात. या मुळे के के रेंजच्या जवळ असणाऱ्या परिसरात धक्के जाणवले असतील. मात्र, हा भूकंप नव्हता. धक्के जाणवल्याचा प्रकार केवळ युद्ध सरावाचे ठिकाण असलेल्या गावांमध्येच घडला. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे प्रांताधिकारी राठोड म्हटले.

(Edited by Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT