Adinath Sugar factory
Adinath Sugar factory  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आदिनाथ कारखाना 'बारामती अॅग्रोला' देण्याचा मार्ग मोकळा...

​अण्णा काळे

करमाळा : श्री आदिनाथ सह. साखर कारखाना (Adinath Sugar factory) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांच्या 'बारामती ऑग्रो'ला (Baramati Agro) भाडेतत्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे येथे कर्ज वसुली निर्देशणालय न्यायालयात बुधवारी (ता.29 जून) रोजी झालेल्या सुनावणीत आदिनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाने हा कारखाना सात दिवसाच्या आत सर्व मिळकतीचा ताबा महाराष्ट्र राज्य सह. बँकेकडे द्यावा व बॅकेने पुढील कार्यवाहीसाठी हा कारखाना 'बारामती ऑग्रोला' देण्यात यावा, असा निकाल दिला असल्याची माहिती 'बारामती ऑग्रो'चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी दिली. कर्ज वसुली निर्देशणालयाचे न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी हा निकाल दिला आहे. (Adinath Sugar factory Latest Marathi News)

या निकालानंतर बारामती ऑग्रोच्या समर्थकांनी फटाके फोडत आनंद साजरा केला. सध्या या कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. सुरवातीला कारखाना भाडेतत्वावर देण्यास बागल गट अनुकूल होता. नंतर मात्र त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचे दिसून येते. आदिनाथ कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या निर्णया विरोधात कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी अर्ज केला होता. यावर हा निकाल देण्यात आला आहे. या सुनावणीवेळी बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, आदिनाथचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, अॅड. पांडुरंग देशपांडे आदी उपस्थित होते.

आदिनाथ कारखाना तीन वर्षापसून बंद आहे. दोन वर्षापूर्वी हा कारखना एमएससी बँकेने थकीत कर्ज वसुल न झाल्याने भाडेतत्वार देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये बारामती अॅग्रोला हा कारखाना भाडेतत्वार देण्यात आला होता. मात्र तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने हस्तांतर रखडले होते. बारामती ऑग्रोने वेळेत हा कारखाना सुरू न केल्याने आदिनाथ बचाव समितीने याबाबत आवज उठवला होता. त्यानंतर संचालक मंडळाने आदिनाथ बचाव समितीच्या मागणीनुसार हा कारखना सहकारी तत्वावरच चालावा व भडेतत्वावर देऊ नये,असा ठराव सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजुर केला होता. त्यानंतर कारखान्याने एमएससी बँकेच्याविरुद्ध कर्ज वसुली निर्देशणालय न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत आज न्यायाधीश दिलिप मुरुमकर यांच्यासमोर सुनावणी झाली आहे.  

बाजार समितीचे माजी संचालक नागेश लकडे, आदिनाथचे माजी संचालक राजेंद्र धांडे, टाकळीचे माजी सरपंच डॉ. गोरख गुळवे, माजी उपसरपंच आदिनथ लाळगे, कात्रजचे माजी अध्यक्ष भारत धायगुडे, टाकळी सोसायटीचे अध्यक्ष संतोष गुळवे आदी यावेळी उपस्थित होते. अॅड. हर्षल साठे व अॅड. वरुण कुलकर्णी यांनी आदिनाथ कारखान्याकडून तर बारामती अॅग्रोकडून अॅड. आनंद आकुट, अॅड. महेश पेठे व अॅड. खासबासदार यांनी काम पाहिले.

आदिनाथचे काम बारामती अॅग्रोकडून तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. सन 2022-23 चा गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करून चालु हंगाम बारामती अॅग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार व आमदार रोहीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करून दाखवणार आहे, असे बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT