शिवसेनेत पहिला उठाव कुणी केला हे बंडखोर आमदार गोगावलेंनी नाव घेऊनच सांगितले...

Bharat Gogawale| Shivsena : बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी आपले मत मांडले आहे.
Bharat Gogavle Latest News
Bharat Gogavle Latest NewsSarkarnama

Bharat Gogawale : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे सुमारे 39 आमदार गुवाहाटीला गेल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिवसेना नेत्यांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. बंडखोर आमदार हे आपली बाजू मांडत आहेत तर शिवसेनेसोबत असलेले नेते बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभेचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी आपली बाजू गुवाहाटीमधुन व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आणि घेतलेल्या भुमिकेचे समर्थन केले. याबरोबर रायगड जिल्ह्यात प्रथम बंड कुणी केले आणि कश्यामुळे केले याबाबत स्पष्ट शब्दात सांगितले आहे. (Bharat Gogavle Latest Marathi News)

Bharat Gogavle Latest News
'मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सोडलं, 'वर्षा' बंगला सोडला पण पवारांना सोडायला तयार नाहीत'

गोगावले म्हणाले की, आपल्याला कल्पना असेल की, आम्ही सद्ध्या गुवाहाटीला असून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे प्रखर विचार घेऊन आम्ही चाललो आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन सर्व आमदार येथे आलो आहेत. कुणाच्याही दबावाला आणि अमिषाला बळी न पडता येथे आलो आहोत. आम्ही कुठलाही अनुचित प्रकार करत नसून करणारही नाही. रायगड जिल्ह्यात जो पहिला उठाव झाला तो आम्ही तिन आमदारांनी मिळून केला आहे. यामध्ये मी, आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि जिल्हाप्रमुखांनी ठरवलं आणि हा उठाव केल्याचे गोगावलेंनी सांगितले.

Bharat Gogavle Latest News
बिहारमध्येही राजकीय भूकंप; ओवेसींना मोठा धक्का, पाचपैकी चार आमदार फुटले

गोगावले आपली बाजू मांडतांना म्हणाले की, राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि कॅाग्रेस सोबत आपली आघाडी नको असून ते शिवसेनेला संपवायला निघाले आहेत. त्यामुळे आम्हाला हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत आम्ही सांगितले होते. मात्र, त्यांना आम्ही सांगितलेल्या काही गोष्टी पटल्या काही पटल्या नाहीत. त्यामुळे आम्ही आमच्या इच्छेने हा निर्णय घेतला. यामध्ये आम्ही कुणाच्या दबावाला किंवा अमिषाला बळी पडलेलो नाही. त्यामुळे कुणावरही शिवसैनिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही गोगावलेंनी केले आहे.

Bharat Gogavle Latest News
बंडखोर आज जिंकलेही, तरी हा त्यांचा क्षणिक विजय; अन् भविष्यातला पराभव !

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांनी उद्या (ता. 30 जून) बहूमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिल्याने सत्तासंघर्षातील घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. त्यामुळे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गुवाहाटीत असलेले सर्व 49 आमदार हे मुंबईत येणार आहेत. मात्र बंडखोर आमदारांमधील शाब्दिक युद्ध चांगलेच रंगतांना दिसत आहे. उद्या हे आमदार मुंबईत आल्यावर काय घडामोडी घडतात आणि बहूमत चाचणी सिद्ध करतांना काय घडामोडी घडतात हे बघणेही महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com