Eknath Shinde News : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंचा कराड दौरा रद्द होण्यामागचं कारण तर वेगळंच; काँग्रेस नेत्याच्या...

Chetan Zadpe

Karad News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कराड दौरा अचानक रद्द करण्यात आला. शिंदेंची प्रकृती ठीक नसल्याने त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी यामागे राजकीय कारण असल्याचेही बोलले जात आहे. काँग्रेस नेत्यांच्या कृषी प्रदर्शनाला जाणं टाळण्यासाठीच मुख्यमंत्री आता कराडला आले नसल्याची चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडला येणार होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांची सत्ता असलेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार होते.

यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा झाला तेव्हाही पृथ्वीराज चव्हाण यांनी काही भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असे जाहीर केले होते. तशी तयारीही केली होती. मात्र, कराडमध्ये महायुतीच्या मुख्यमंत्र्यांकडून महाविकास आघाडीच्या आमदाराने केलेल्या विकासकामांचे उद्घाटन होणं, म्हणजे कराड दक्षिण भाजपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकट असलेल्या डॉ. अतुल भोसले यांच्यासाठी योग्य नव्हतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कार्यक्रमामुळे भाज कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला असता म्हणून भाजप वर्तुळातून हालचाली झाल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा एकत्रित कार्यक्रम रद्द झाला. आज पुन्हा हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले असते. मात्र, पुन्हा एकदा चावी फिरली आणि मुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री एकत्र येणं रद्द झालं. हा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर कराड दक्षिण भाजपमध्ये खुशी, तर काँग्रेसमध्ये गम आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT