Mumbai News : भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचा उद्धव ठाकरे हे लपून छपून प्रयत्न करत आहेत. युतीसाठी ते भाजपला पायघड्या घालत आहेत, असा गौप्यस्फोट आमदार नीतेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर बोलताना केला. (Thackeray's attempt to Re-Alliance with BJP : BJP MLA's Secret Blast)
खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या देशाला २०१४ पासून पनवती लागली आहे, ती येणाऱ्या २०२४ मध्ये संपेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. त्या टीकेला उत्तर देताना आमदार नीतेश राणे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या मालकाचे २०१४ आणि २०१९ मध्ये १८ खासदार निवडून आले आहेत. तुमच्या मालकाला सत्ता मिळाली आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाला व पंतप्रधान मोदी यांना नावे ठेवता. तुमच्या मालकाला जाऊन जरा विचारा, भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा युती करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. युतीसाठी भाजपला पायघड्या घालण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, ते तुमचे लोक आणि मालक का करत आहेत, असा सवाल राणे यांनी संजय राऊत यांना केला आहे.
डिक्शनरीमध्ये पनवती या शब्दाच्या पुढे संजय राऊत असंच लिहिले पाहिजे. हे चपट्या पायाचे संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात, तेथील पक्ष संपतो किंवा ते घर फोडून टाकतात. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले, आज ठाकरेंची काय अवस्था झाली आहे बघा. तसंच शरद पवार यांचंसुद्धा झालं आहे, असा दावाही नीतेश राणे यांनी केला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
देशाला २०१४ पासून पनवतीची पिडा लागली आहे. हे आम्ही कोणा व्यक्तीच्या विरोधात बोललो नाही, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ते मनावर घेतले नाही पाहिजे. पनवती हा शब्द संपूर्ण जगात आणि देशात वापर केला जातो. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात. त्यांना पनवती या शब्दाचा एवढा तिरस्कार नसला पाहिजे. पनवती या शब्दाचा अर्थ अगोदर तुम्ही समजून घेतला पाहिजे, त्यानंतर एफआयआर आणि इतर गोष्टी केल्या पाहिजेत, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.