CM Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांनी मराठा नेत्यांचे कान उपटले; नेत्यांनी मराठ्यांना वंचित ठेवलं!

Maratha Reservation: आमच्या सरकारने आरक्षण देण्याची भूमिका घेतली.

Vishal Patil

मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून विरोधात वक्तव्य करणाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. 'मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठं केलं, पण नेत्यांनी मराठा समाजाला वंचित ठेवले. आज मराठा समाजाला देण्याची वेळ आली. तेव्हा अशा प्रकारची तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत. ती करू नयेत,' असेही म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मरळी -दौलतनगर येथे शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नासाठी आले होते. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार उपस्थित होते.

मराठा समाजाला गेले अनेक वर्षे वंचित राहावं लागलं. आमच्या सरकारने आरक्षण देण्याची भूमिका घेतली. आमच्या भूमिकेमुळे कोणत्याही समाजावर अन्याय झाला नाही, सर्व समाज आमचेच आहेत. त्यामुळे एकाच काढून दुसऱ्याला देण्याचं काम आमचं सरकार करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका असताना अडथळे आणणे, तोंडाला पाने पुसली म्हणणे. सर्व्हेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं, हे टाळलं पाहिजे. मराठा समाजाने अनेक नेत्यांना मोठं केलं, पण मराठा समाज वंचित ठेवला. आज मराठा समाजाला देण्याची वेळ आली. तेव्हा अशा प्रकारची तेढ निर्माण करू नयेत, असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका करणाऱ्या नेत्यांना दिला आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतापगडला भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी किल्ले प्रतापगड संवर्धनासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याबाबत माहिती देऊन येथे सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली.

विकास कामांना शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. या प्रसंगी आई भवानी मातेची पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT