Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

CM Fadnavis announcement : महिला डाॅक्टर आत्महत्या प्रकरणात फलटणमधून CM फडणवीसांची मोठी घोषणा अन् माजी खासदार निंबाळकरांना क्लिन चिट

ex-MP Nimbalkar clean chit News : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

सरकारनामा ब्युरो

Satara News : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साताऱ्यातील फलटण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल भाष्य केले. फलटणमधील घटना ही अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या घटनेत महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी आम्ही कुणालाही सोडणार नाही. या घटनेत जो कुणी आरोपी असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे सीएम फडणवीस (Devendra fadnavis) यावर काय बोलणार याकडे लक्ष लागले होते.

परवा आमची एक लहान बहिण जी डॉक्टर होती, ज्यांचा अतिशय दुर्दैवीपणे मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली. ही आत्महत्या करताना त्याचे कारणही आपल्या हातावर लिहून ठेवले. पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्यांना अटकही केली. त्यातले सर्व सत्य हे बाहेर येत आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी आम्ही कुणालाही सोडणार नाही. या घटनेत जो कुणी आरोपी असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, संबधित पोलीस अधिकाऱ्यांना कालच निलंबित करण्यात आले आहे. विरोधकांनी या प्रकरणाचे राजकारण करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

माजी खासदार निंबाळकरांना दिली क्लिन चिट

गेल्या काही दिवसापासून प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचे, अशाप्रकारचा निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. मी फलटणमध्ये येवू नये यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. कोणत्याही गोष्टीमध्ये राजकारण करु नका. या आत्महत्या प्रकरणात स्थानिक नेत्यांबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका असती तर मी नावाचा देवाभाऊ आहे, लगेच कार्यक्रम रद्द केला असता असे म्हणत त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन कांबळे पाटील यांना क्लिनचीट दिली. या प्रकरणातील संशयित दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची सत्यता लवकरच स्पष्ट होईल, असेही आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT