Phaltan Doctor death case : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राहुल गांधी आक्रमक; पत्रातील ‘त्या’ उल्लेखावरून दिले मोठे संकेत

Rahul Gandhi’s Reaction to Phaltan Woman Doctor Suicide Case : गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनी या निष्पाप मुलीविरोधात सर्वात घृणास्पद गुन्हा केला, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Rahul Gandhi raising concerns over the Phaltan woman doctor suicide case, targeting the ruling BJP government.
Rahul Gandhi raising concerns over the Phaltan woman doctor suicide case, targeting the ruling BJP government.Sarkarnama
Published on
Updated on
  1. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीची आत्महत्या : पीडितेने तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली असून या घटनेने राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.

  2. राहुल गांधींची थेट प्रतिक्रिया : राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले, “ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. सत्ता जेव्हा गुन्हेगारांची ढाल बनते, तेव्हा न्याय कुणाकडून मागायचा?” — असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

  3. राजकीय वादाला तोंड : पीडितेच्या पत्रात खासदारांच्या पीएंचा उल्लेख आणि तिच्या नातेवाईकांचा आरोप यामुळे प्रकरणाला राजकीय रंग चढला असून भाजपवर काँग्रेस आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Criticism of BJP and Maharashtra Government : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली आहे. पीडिने तळहातावर लिहिल्या सुसाईड नोटमधील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणावरून आता राजकारणही चांगलेच तापले आहे. त्याला कारणीभूत ठरले आहे, ते पीडितेच्या पत्रातील एक उल्लेख.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही फलटणमधील या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. पीडितेने एका पत्रामध्ये खासदाराच्या दोन पीएंनी आपल्याशी संपर्क केल्याचा उल्लेख केला आहे. तिच्या नातेवाईकांनीही खासदारही तिच्याशी बोलल्याचा दावा केला आहे. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनीही थेट काही नेत्यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहे.

राहुल गांधी यांनीही याच मुद्द्याच्या आधारे भाजपवर थेट हल्ला चढवला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सातारा येथे बलात्कार आणि छळाला कंटाळून पीडितेने केलेली आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी एक शोकांतिका आहे. इतरांचे दुःख कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी एक हुशार डॉक्टर मुलगी भ्रष्ट सत्ता आणि व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाचा बळी ठरली.

Rahul Gandhi raising concerns over the Phaltan woman doctor suicide case, targeting the ruling BJP government.
Top 10 News : मोदी-शहांचा शिंदेंना आदेश, दिल्लीत काय घडलं?, मुरलीधर मोहोळांपुढे एकमेव पर्याय, निवडणूक आयोगाचा भाईचारा; वाचा महत्वाच्या घडामोडी

गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनी या निष्पाप मुलीविरोधात सर्वात घृणास्पद गुन्हा केला. तिच्यावर बलात्कार आणि शोषण केले. वृत्तांनुसार, भाजपशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्नही केला, असे राहुल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Rahul Gandhi raising concerns over the Phaltan woman doctor suicide case, targeting the ruling BJP government.
Murlidhar Mohol : जैन बोर्डिंगच्या वादातून वाचण्याचा मुरलीधर मोहोळांपुढे 'हाच' एकमेव पर्याय...

सत्तेच्या संरक्षित गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या आहे. जेव्हा सत्ता गुन्हेगारांची ढाल बनते, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची?, असा सवाल करत राहुल म्हणाले, पीडितेच्या मृत्यूने भाजप सरकारचा अमानवी आणि संवेदनाहीन चेहरा उघड पडला आहे.

न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. भारतातील प्रत्येक मुलीला आता भीती नाही, न्याय हवा आहे, असेही राहुल यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी फलटणमधील प्रकरणाची थेट भाजपशी लिंक जोडत मोठे संकेत दिले आहे. त्यांच्याकडून आता देशभरात हा मुद्दा तापविला जाण्याची शक्यता आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

फलटणमधील आत्महत्येचे कारण काय होते?
A: पीडित डॉक्टर तरुणीने लैंगिक शोषण आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Q2: आरोपी कोण आहेत?
A: पीडितेच्या सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Q3: राहुल गांधींनी काय म्हटले?
A: त्यांनी म्हटले, “ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे; सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देत आहे.”

Q4: या प्रकरणाचे पुढील पाऊल काय आहे?
A: पोलिस तपास सुरू आहे. विरोधकांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com