Balasaheb Patil, Pravin Darekar
Balasaheb Patil, Pravin Darekar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सहकार विभागाचा पेनड्राईव्ह दरेकरांकडे! बाळासाहेब म्हणाले, काळजीचे कारण नाही...

हेमंत पवार

कऱ्हाड : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर केलेल्या कारवाईत राजकीय सुड उगवण्याची महाविकास आघाडी सरकाची भूमिका निश्चीत नाही. मात्र, त्यांची तक्रार झाली म्हणुन त्यांना राग आला आहे. त्यामुळे ते पश्चिम महाराष्ट्रातील संस्थाची माहिती घेत आहेत. सहकारी संस्था चांगल्या चालल्या आहेत. मात्र, तरीही मोघम बोलणे योग्य नाही. सहकार विभागाचा पेनड्राईव्ह देण्यामुळे फारसा फरक पडणार नाही. तो दिल्यास आम्ही चौकशी करु, असे स्पष्टीकरण सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी श्री. दरेकर यांच्या आरोपवर केले आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दरेकर यांनी साताऱ्यात सहकारी संस्थातील भ्रष्टाचारासंदर्भात वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ घेवुन सहकारमंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, ''मुंबई जिल्हा बॅंकेवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे अध्यक्ष म्हणुन काम पहात होते. ते मजूर संस्थांतून निवडुन येत होते. त्याबाबत त्यांची तक्रार करण्यात आली. त्याची सहकार विभागाच्यावतीने चौकशी झाल्यावर त्यांना मजूर म्हणुन अपात्र जाहीर केले आहे. त्यांनी दोन मतदारसंघातून अर्ज भरले होते.

निवडुन आलेल्या मतदारसंघातील अर्ज ठेवुन दुसऱ्या ठिकाणचा राजीनामा दिला. ही परिस्थि लक्षात आल्यावर त्यांच्याबद्दल 'आप' पक्षाच्या शिंदे यांनी सहकार व गृह विभागाकडे तक्रार केली. त्यामध्ये त्यांनी मजूर या व्याखेत बसुन अनेक वर्षे मुंबई जिल्हा बॅंकेवर काम केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. श्री. दरेकर हे विधान परिषदेला उभे राहताना व्यावसाय म्हणुन स्वतःची नोंद केली होती. मजूर म्हणुन नोंद केलेली नव्हती. हा गुन्हा आहे, असे लक्षात आल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामध्ये राजकीय सुड उगवण्याची महाविकास आघाडी सरकाची भूमिका निश्चीत नाही. मात्र, काही मंडळी येतात आणि वल्गना करतात. मुळात मजूर या कॅटॅगरीत अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये गुन्हा घडला याची चौकशी सुरु आहे. त्यामुळे गृह विभाग आणि सहकार विभागाकडुन हा गुन्हा दाखल केलेला आहे. मंत्री पाटील म्हणाले, ''ज्यावेळी ते मजूर संस्थेत आले त्यावेळी त्यांनी रंगारी असे दाखवले आहे. त्यासाठीचा मोबदला त्यांनी चेकने न घेता रोख घेतला आहे. त्याच दरम्यानच्या, काळात अधिवेशनही सुरु होते. त्यामुळे मोबदला कसा घेतला हा संशोधनाचा भाग आहे.

महाराष्ट्रात सहकारी संस्थाचे जाळे मोठे आहे. पश्चिम महाराष्ट्रातही जाळे मोठे आहे. दरेकर यांनी सहकारात काम करताना मजूर म्हणुन ते अनेक वर्षे त्या संस्थेवर गेले. त्याची तक्रार झाली म्हणुन त्यांना राग आला आहे. त्यामुळे ते पश्चिम महाराष्ट्रातील संस्थाची माहिती घेत आहेत. त्याबद्दल काहीही हकरत नाही. सहकारी संस्था चांगल्या चालल्या आहेत. मात्र, तरीही तक्रार करायची असेल तर काहीही हरकत नाही. त्यांनी खोट्या कर्जाची माहिती दिल्यास चौकशी करु. मात्र, मोघम बोलणे योग्य नाही. सहकार विभागाचाही पेनड्राईव्ह देण्यामुळे फारसा फरक पडणार नाही. तरीही आम्ही त्याची चौकशी करु,'' असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT