यशवंतरावांच्या विचारावरच राज्याची वाटचाल : सहकारमंत्री पाटील

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण Late Yashwantrao Chavan यांच्या जयंतीनिमित्त येथील प्रितीसंगमावरील त्यांच्या समाधीस्थळी मंत्री Minister बाळासाहेब पाटील Balasaheb Patil, खासदार MP श्रीनिवास पाटील Srinivs Patil आदिंनी अभिवादन केले.
Balasaheb Patil, Srinivas Patil
Balasaheb Patil, Srinivas Patilkarad Reporter
Published on
Updated on

कऱ्हाड : महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी केले. राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र पुरोगामी विचाराने त्यांनी पुढे नेला. सहकारी साखऱ कारखानदारी उभी करुन सामान्य शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक क्रांती केली. त्यांच्या विचाराने आज महाराष्ट्र राज्याची वाटचाल सुरू आहे, असे स्पष्ट मत सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

Balasaheb Patil, Srinivas Patil
बाळासाहेब पाटील कराडकरांवर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त येथील प्रितीसंगमावरील त्यांच्या समाधीस्थळी मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील आदिंनी अभिवादन केले. दरम्यान मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधुन आलेल्या यशवंत ज्योतीचे स्वागत मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाले.

बाळासाहेब पाटील म्हणाले, ''स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी खूप त्याग केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजकरणात काम करताना महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. राज्याची निर्मिती झाल्यानंतर हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराने पुढे गेला पाहिजे, याला आधुनिकतेची कास असली पाहिजे असे धोरण त्यांनी राबवले. राज्यात पिकणाऱ्या मालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी राहिली पाहिजे यासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले. त्यांच्या विचाराने महाराष्ट्र राज्याची वाटचाल सुरू आहे.''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com