Prabhakar Deshmukh, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan MIDC News : 'कॉरिडाॅर'साठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती; प्रभाकर देशमुख जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

Mhaswad Farmers म्हसवड येथे सोमवारी (ता. ३०) प्रकल्पाधिकारी अन् शेतकरी यांच्यात जोरदार संघर्ष झाल्याने प्रकल्पाधिकाऱ्यांनी पोलिस बळाचा वापर करीत आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत

Umesh Bambare-Patil

-सल्लाउद्दीन चोपदार

Maan Corridor MIDC News : म्हसवड येथे नियोजित असलेल्या मुंबई- बंगळुरू कॉरिडाॅर ( बीएमआयसी ) प्रकल्पासाठी सध्या जमीन संपादित करण्यासाठी प्रकल्पाधिकारी पोलिस बळाचा वापर करीत आहेत. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. या विरोधात लवकरच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना भेटणार असल्याचे राष्ट्रवादीचे माण, खटावचे नेते प्रभाकर देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

म्हसवड ( मासाळवाडी ) येथे मुंबई- बंगळुरू कॉरिडाॅर Corridor MIDC प्रकल्पाबाबत सोमवारी (ता ३०) प्रकल्पाधिकारी अन् शेतकरी यांच्यात जोरदार संघर्ष झाल्याने प्रकल्पाधिकारी यांनी पोलिस बळाचा वापर करीत आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. या पार्श्वभूमीवर म्हसवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रभाकर देशमुख Prabhakar Deshmukh बोलत होते.

प्रभाकर देशमुख म्हणाले, राजकारणात येण्यापूर्वी प्रशासनात अधिकारी म्हणुन काम केले आहे. प्रशासकीय सेवेत असताना चाकण येथील एमआयडीसीसाठी जागा अधिग्रहण शेतक-यांना विश्वासात घेऊनच केले होते. कोणताही प्रकल्प हा स्थानिकांच्या मर्जीशिवाय आणता येत नाही.

मुळात त्यासाठी कोणावरही जबरदस्ती करता येत नाही. माण तालुक्यात औद्योगिक क्रांती होत आहे ही फार अभिमानाची बाब आहे. येथे औद्योगिक प्रकल्प सुरू झाले तर बेरोजगारी संपुष्टात येणार आहे. हा प्रकल्प व्हावा ही सर्वच माणवासीयांची भावना आहे. सध्या या प्रकल्पासाठी जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यासाठी म्हसवड लगतच्या हजारो एकर जमीन संपादित केली जाणार आहे.

मात्र ज्या शेतक-यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत, त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. ही बाब जिल्हाधिकारी यांना भेटून त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास लोकप्रतिनिधींनीही समन्वयकाची भूमिका घेऊन शेतकरी व प्रकल्पाधिकारी यांच्यातील दुवा बनले पाहिजे मात्र येथे असे होताना दिसत नाही. Maharashtra political news

सामान्य शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे पूर्णपणे चुकीचे असून यासाठी लवकरच आपण जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षकांना भेटून संबधितावरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT