Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Minister Chandrakant Patil : मंत्री पाटलांना 'भलताच' कॉन्फिडन्स; सोलापूर, माढ्यात सुप्त लाटेचा करिष्मा दिसणार?

Pradeep Pendhare

Solapur News : राज्यात सोलापूर आणि माढ्याच्या जागेबाबत सर्वाधिक उत्सुकता आहे. एक्झिट पोल या दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे दाखवत असले तरी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही जागांबाबत 'भलताच' कॉन्फिडन्स आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुप्त लाट होती. सोलापूर आणि माढा या दोन्ही जागांसह राज्यात महायुतीच्या 35 जागा येतील, असा कॉन्फिडन्स मंत्री पाटील यांनी केला आहे.

सोलापूरमधील विजयाबाबत बहुतांशी कल महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या (Congress) उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या बाजूने दाखवले गेले. तसेच माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बाजूने कल आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही जागेबाबत आम्ही ठाम आहोत. आशावादी आहोत. कल काहीही असोत, राज्यात महायुतीच्या 35 जागा येतील. एक्झिट पोलनुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होत आहे, याचा आनंद असल्याचे मंत्री पाटील यांनी म्हटले.

एक्झिट पोलनंतर सोलापूर भाजपमध्ये देखील पडसाद उमटले. कल काहीही असो निवडून येणार तर, भाजपचाच उमेदवार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विरोधकांकडून फक्त गाजावाजा आहे. भाजपने (BJP) गाजावाजा न करता मतपेटी भरली आहे. देशासाठी मोदी हवे असणाऱ्यांनी कुठेही कसली चर्चा न करता भाजपला मतदान केले आहे. हा विश्वास चार जूनला मतपेटीत दिसेल, असा दावा सोलापूर भाजपकडून केला गेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर आणि माढा मतदारसंघात विधानसभानिहाय 14 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. साधारण 22 ते 23 मतफेऱ्या होतील. पहिल्या फेरीचा निकाल येण्यास तासभर लागेल, असा अंदाज आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत मतमोजणी अंतिम टप्प्यात पोहोचेल. यावेळी निकालेच चित्र होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT