Maratha reservation meeting kolhapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

kolhapur Maratha Reservation Meeting : अजितदादांसमोर कोल्हापुरात प्रचंड गदारोळ; मराठा आरक्षणाच्या बैठकीत बाचाबाची

Ajit Pawar News : आम्ही काय आता मरायचं का, असा सवाल कार्यकर्त्यांनी बैठकीत केला.

सरकारनामा ब्यूरो

kolhapur News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणाच्या संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये या वेळी बाचाबाचीही झाली. (Confusion at the Maratha reservation meeting in front of Ajit Pawar in Kolhapur)

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज कोल्हापुरात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मराठा आरक्षण समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले होते. त्या बैठकीतच उपमुख्यमंत्र्यासमोर राडा झाला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून ऐरणीवर आलेला आहे. राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजात असंतोषाची भावना आहे. राज्य सरकारकडून समाजाला आरक्षणाच्या समकक्ष योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र, मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावर ठाम आहे.

कोल्हापुरात आज अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मराठा आरक्षणाशिवाय दुसरा कोणताही मुद्दा महत्वाचा नाही. सर्वांना खाली बसवा. आम्ही काय आता मरायचं का, असा सवाल कार्यकर्त्यांनी बैठकीत केला. कार्यकर्ते हे आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत होते. या वेळी कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी आलेल्या पोलिसांबरोबर त्यांची बाचाबाची झाली.

उपमुख्यमंत्री व इतर नेते कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे वारंवार आवाहन करत होते. मात्र, कार्यकर्ते शांत होण्याचे नाव घेत नव्हते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र, त्यांचेही कार्यकर्त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे पोलिस अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये थोडावेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT