Barshi News : ‘बार्शीत तुम्ही लढा. तुमच्या पाठीशी मी माझी संपूर्ण ताकद उभी करणार आहे. बार्शी नगरपरिषद आणि विधानसभेच्या तयारीला लागा. संपूर्ण ताकदीने आपण लढू आणि जिंकू,’ असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले आणि मकरंद निंबाळकर यांच्या शिष्टमंडळाला दिला. ('You fight in barshi; All strength stands behind you': Sharad Pawar's words to Barbole)
बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता. १४ ऑगस्ट) बारामती येथील गोविंदबागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. विश्वास बारबोले, मकरंद निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार यांच्याशी बारामतीत जाऊन चर्चा केली. त्यावेळी पवारांनी तुम्ही कोणतीही काळजी करू नका. माझी संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी असेल, असा शब्द दिला.
राष्ट्रवादीत उभी फूट पाडून अजित पवार हे भाजपसोबत जाऊन युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजितदादांसोबत ३० ते ३५ आमदारही असून त्यांच्यासोबत इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काही आमदार आणि खासदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे बार्शी शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी कोणाकडे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
याचदरम्यान, बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले आणि मकरंद निंबाळकर यांनी पदाधिकाऱ्यांसह बारामती येथे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन आम्ही तुमच्या सोबत असल्याचे जाहीर केले. त्यावेळी पवारांनी आगामी निवडणुका संपूर्ण ताकदीने लढण्याचा सल्लाही दिला.
वैराग भागातील नागरिक व पदाधिकाऱ्यांची साथ शरद पवार यांनाच असल्याचे वैरागचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंद निंबाळकर यांनी या वेळी सांगितले. माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांनी बार्शी शहरातील राजकीय परिस्थिती पवार यांच्यासमोर मांडली.
भेटीवेळी इक्बाल पटेल, विक्रम सावळे, सुवर्णा शिवपुरे, किरण देशमुख, सुनील जावळी, विक्रमसिंह पवार, महेश चव्हाण, बाळासाहेब पवार, भारत देशमुख, कमलाकर पाटील, कालिदास मुकटे, आनंद काशीद, अजित कांबळे, राहुल कदम, आदेश वाणी, गिरीश कदम, शंकर देवकर, आदित्य पाटील, चंद्रकांत बोकेफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.