Chetan Narote Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chetan Narote : सोलापुरात काँग्रेसचा गड ढासळला पण सिंह आला; शहराध्यक्ष चेतन नरोटेंचा अटीतटीच्या लढतीत विजय

Solapur Congress News : सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे २३८ मतांनी विजयी झाले. भाजप लाटेतही त्यांनी काँग्रेसचे अस्तित्व कायम ठेवले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 16 January : सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधील अटीतटीच्या लढतीत काँग्रेस व्होटिंगमुळे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे २३८ मतांनी विजयी झाले आहेत. भाजपच्या लाटेमध्ये शहरातील काँग्रेस पक्ष भूईसपाट झालेला असताना शेवटच्या टप्प्यातील मतमोजणीत नरोटे यांनी विजय मिळवत काँग्रेसचे अस्तित्व राखले आहे.

दरम्यान, संपूर्ण शहरावर एकेकाळी वर्चस्व गाजवलेल्या काँग्रेसला अवघ्या दोन प्रभागांत दोन जागांवर विजय मिळविता आल्याने पक्षाची मोठी दुर्दशा झाली आहे. एकेकाळचा काँग्रेस गड पूर्णपणे ढासळला असून शहराध्यक्षांच्या विजयामुळे गड गेला पण सिंह आला अशी स्थिती झाली आहे.

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीसोबत राहून निवडणूक लढवली होती. महाआघाडीत काँग्रेसने ५४ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातील ४८ जागांवर काँग्रेसने हाताच्या चिन्हावर उमेदवार उतरविले होते, तर सहा अपक्षांना पुरस्कृत केले होते. या ४८ जागांपैकी केवळ दोन जागांवर काँग्रेसला यश आले आहे.

प्रभाग क्रमांक १५ मधून शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरीफ शेख हे मातब्बर निवडणूक लढवत होते. त्यांच्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रचार केला होता. मात्र, विनोद भोसलेंसारखा चेहरा ऐनवेळी भाजपत गेल्याने, तर केंद्रापासून राज्यात सत्ता असलेल्या भाजपने नरोटे यांना घेरले होते.

चेतन नरोटे यांच्या पराभवासाठी भाजपकडून व्यूहरचना करण्यात आलली होती. भाजपच्या मनसुब्यांना सुरूंग लावत नरोटे यांनी अखेर २३८ मतांनी प्रभाग क्रमांक १५ मधून विजय मिळविला आहे. प्रभाग क्रमांक १५ ची मतमोजणी दुपारी उशिरा सुरू केल्याने निकालही उशीरा लागला. मात्र, नरोटे यांच्या निकालाची संपूर्ण शहरात उत्सुकता होता.

चेतन नरोटे ते प्रभाग क्रमांक १५ तर त्यांच्या जोडीला काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक १६ मधून नरसिंह आसादे हे विजयी झाले आहेत. स्थापनेपासून २०१७ पर्यंत महापालिकेवर सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर विजय मिळवता आला आहे, त्यामुळे पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या दोघांमुळे काँग्रेसचे अस्तित्व राखले गेले असले तरी भविष्यातील शहरातील पक्षाची वाटचाल धोक्यात आल्याचे मानले जात आहे. पराभवाच्या या धक्क्यातून सावरण्याची मोठी जबाबदारी शहराध्यक्ष विजयी उमेदवार नरोटे यांच्यावरच असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT