

Solapur, 16 January : सोलापुरात भारतीय जनता पक्षाची मोठ्या बहुमताने सत्ता येणार हे आता निश्चित झाले आहे. पॅनेल टू पॅनेल मतदान झाल्याने भाजप ८० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या परिस्थितीत आहे. भाजपच्या लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे गड उद्ध्वस्त झाले आहेत. सर्व प्रमुख पक्षांनी भाजपपुढे हात टेकलेले असताना ‘एमआयएम’ने भाजपला टक्कर दिल्याचे दिसून येते. सोलापुरात एमआयएमने दोन प्रभागांत विजय मिळवला आहे. मात्र, विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याइतके संख्याबळ त्यांच्याकडेही नसल्याने सोलापुरात हे पद रिक्त राहण्याची शक्यता आहे.
सोलापूर (Solapur) महापालिकेच्या १०२ जागांपैकी ९१ जागांचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत. त्यातील 78 जागा भाजपने जिंकल्या आहेत. शिंदे सेना चार, तर काँग्रेस एक, तर एमआयएमने आठ जागा जिंकल्या आहेत. सोलापुरात पॅनेल टू पॅनेल मतदान झाल्याने भाजप ‘क्लीन स्वीप’ देण्याच्या स्थितीत आहे. सोलापूरमध्ये मागील २०१७ च्या निवडणुकीत एमआयएमच्या नऊ जागा निवडून आल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर एमआयएचे सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते.
विद्यमान निवडणुकीत एमआयएमने जोरदार टक्कर दिली होती. त्यांची लढत प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराशी झाली. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसे यांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी दोन सभा घेतल्या होत्या. त्या सभेत त्यांंनी भाजपच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि एमआयएमध्ये काँटे की टक्कर झाल्याचे दिसून येते.
एमआयएमचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत. यात प्रभाग क्रमांक 14-अ अकिला अ.कादर भागनगरी (7930 मते) हे विजयी झाले आहेत. 14-ब मधून आसीफअहमद पीरअहमद शेख हे (6298 मते), 14-क वहिदा बानो कासिमसाब शेख (9020 मते) 14-ड हत्तुरे तौफिक बाबूमियाँ (6563) हे चौघे विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक 20 अ चौधरी सफीया मोहम्मद शफीक, 20-ब अनिसा निजाम मोगल, 20-क अजहर अ. गनी हुंडेकरी , 20-ड अझरोद्दिन सज्जाद अहमद जहागीरदार हे विजयी झाले आहेत.
विरोधी पक्षनेतेपदाचे काय होणार?
सोलापुरात एमआयएम दोन नंबरचा पक्ष ठरला आहे. मात्र, विरोधी पक्षनेते होण्याएवढे संख्याबळ त्यांच्याकडे नसल्यामुळे सोलापुरात विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसने आतापर्यंत दोन जागांवर, तर शिवसेना चार, तर अजित पवारांची राष्ट्रवादी एक जागेवर जिंकली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.