Shashikant Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shashikant Shinde : शशिकांत शिंदेंची होणार अडचण; कोरेगाववर काँग्रेसचा दावा

Sunil Balasaheb Dhumal

पांडुरंग बर्गे

Koregaon Political News : आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला हवेत. त्यात कोरेगाव विधान मतदारसंघाला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे, असे काँग्रेसचे सातारा जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी स्पष्ट केला आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

प्रदेश काँग्रेसच्या आदेशावरून कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक जिल्हा प्रभारी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव होते. चव्हाण म्हणाले, कोरेगाव मतदारसंघात अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून आजअखेर काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan यांना तर या मतदारसंघाविषयी, औत्सुक्य राहिले आहे.

कोरेगाव मतदारसंघातील बहुजन समाजात मोठी राजकीय समज व उमज आहे. कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातून तीन मतदारसंघ हे काँग्रेसला मिळावेत, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी घेतली आहे. त्यात कोरेगाव विधान मतदारसंघाला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे, असे चव्हाणांनी स्पष्ट केले.

जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी कोरेगावातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी अधिकचे कष्ट घेणे गरजेचे आहे. मतदार हा काँग्रेससोबत आहे, हे लोकसभा निवडणूकीत स्पष्ट झाले आहे. परंतु,कोरेगावातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde सापत्न वागणूक देत असल्याबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे, असेही जाधव म्हणाले.

बुथनिहाय प्रतिनीधींची नेमणूक करून जनसंपर्क अभियान कार्यकर्त्यांनी राबवावे, अशी सूचनाही यावेळी जाधवांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT