Pune Political News : पुण्याच्या पूर परिस्थितीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांवर निशाणा साधला. यानंतर या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले.
त्यानंतर मिटकरींवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला. यावरून राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेला आरसा दाखवण्याचे काम केले.
अजित पवारांवरील Ajit Pawar टीकेनंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे हे सुपारी बाज असल्याचे म्हटले होते. हे वक्तव्य मनसैनिकांच्या जिव्हारी लागले. त्यातून त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. हे येथेच थांबले नाही तर पुण्यातील मनसैनिकांनीही मिटकरींना इशारा दिला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसे पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मनसे सुरू असलेल्या वादावर रूपाली ठोंबरे पाटील Rupali Thombre म्हणाल्या, पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक नेते पूर परिस्थितीचे पाहणी करण्यासाठी आले होते. त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर, राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर दिले. मात्र राजकारणाचा दर्जा इतका खाली आलाय की, प्रत्युत्तर दिले म्हणून डायरेक्ट हाणामारीची भाषा केली गेली, याकडेही ठोंबरे पाटील यांनी लक्ष वेधले.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी Amol Mitkari यांची गाडी फोडली तसेच त्यांना गाडी फोडल्यानंतर जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेनंतर 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या 22 हल्लेखोरांपैकी एक मनसेच्या कार्यकर्त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. ही अत्यंत दुःखद घटना आहे, असेही त्या म्हणाल्या.
रूपाली ठोंबरे पाटील यांनी, विचारांची लढाई झाली पाहिजे, टीका करताय तर प्रत्युत्तर सहन करायची तुमची तयारी पाहिजे. पुण्यात देखील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की अमोल मिटकरी पुण्यात आल्यावर कपडे काढून मारू. मात्र महाराष्ट्रात तुमच्या बापाचे राज्य नाही. तर कायद्याचे राज्य आहे. हा गुन्हेगारीचा आखाडा नाही. त्यामुळे वक्तव्य करताना मनसेच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी तारतम्य बाळगणे आवश्यक आहे, अशा शब्दांत ठणकावले.
राजकारणात विकासाबद्दल बोलायला पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्त्यांना कळाले पाहिजे. अमोल मिटकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण नको. तुमची मर्दानगी तुमच्या घरी दाखवा. मनसेच्या MNS कार्यकर्त्यांनी भाषा जपून वापरावी. आंदोलन जनतेच्या विकासासाठी करा, जनतेच्या कामासाठी शंभर वेळा जेलमध्ये जावा. मात्र अशा पद्धतीचे कृत्य कराल तर राष्ट्रवादी काँग्रेसही तोडीस तोड उत्तर देईल, असा इशाराही रूपाली पाटील यांनी दिला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.