Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ratnagiri Congress : रत्नागिरीत ठाकरे गटापाठोपाठ काँग्रेसनेही कूस बदलली? लवकरच मिळणार जिल्हाध्यक्ष

Operation Tiger : रत्नागिरी जिल्ह्यात एकीकडे ऑपरेशन टायगर जोर धरत असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस फोडली जात आहे. यामुळे सध्या रत्नागिरीत उद्धव ठाकरे गटाने डॅमेज कंट्रोल करण्याकडे लक्ष दिले आहे.

Aslam Shanedivan

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ऑपरेशन टायगरची धास्ती महाविकास आघाडील पक्षांनी घेतली आहे. येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन माजी आमदार फोडले असून एका तालुका अध्यक्षाला शिंदे शिवसेनेत घेतलं आहे. माजी आमदारांचा अद्याप प्रवेश झालेला नसून तो येत्या काही दिवसात होणार आहे. तर पक्ष फोडाफोडीमुळे ठाकरे यांच्या शिवसेनेसह काँग्रेस आता अलर्टमोडवर आली असून डॅमेज कंट्रोल करण्यावर पक्ष सध्या लक्ष देत आहे.

रत्नागिरीचे ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांना फोडत त्यांच्याकडे शिंदे गटाने तालुकाप्रमुख दिल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता रत्नागिरीतील राजकीय घडामोडींमध्ये वेग आला असून ठाकरे गटाने लगेच शेखर घोसाळे यांची तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करत डॅमेज कंट्रोल केले आहे.

यानंतर आता काँग्रेसने देखील रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्षपदासाठी मुलाखती घेतल्या असून निरीक्षक अजिंक्य देसाई यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पाच जनांनी जिल्हाध्यक्षपदासाठी मुलाखती दिल्या असून याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर केला जाणार आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. महाविकास आघाडी म्हणून लोकसभेला सामोरे गेल्यानंतर लाड यांनी राजापुरात चांगली मेहनत घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना चांगले मताधिक्य दिले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्याला पक्षाकडून संधी मिळेल, अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी आग्रही धरला होता. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघ उबाठा शिवसेनेच्या वाट्याला गेला. विद्यमान आमदार राजन साळवी यांना पुन्हा संधी देण्यात आली. या यामुळे ते नाराज झाले होते. त्यांनी बंडखोरी करत आपला अर्ज भरला होता. यावरून त्यांना पक्षाने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. त्यामुळे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले होते.

आता जिल्ह्यातील स्थिती पाहता पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष नेमण्याच्या कामाला वेग आला आहे. यासाठी निरीक्षक अजिंक्य देसाई रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यांनी इच्छुक असलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये हरिश शेखासन, सहदेव बेटकर, दीपक राऊत, अशोक जाधव, कॅ. हनिफ खलपे यांचा समावेश आहे. या मुलाखतींचा अहवाल देसाई प्रदेशाध्यक्षांना देणार असून त्यानंतर जिल्हाध्यक्षपदाची घोषणा होणार आहे.

जिल्ह्यात काँग्रेस रसातळाला

गेल्या २० वर्षात काँग्रेसल जिल्ह्यात ताकद मिळाली नसल्याने काँग्रेस रसातळाला गेली आहे. सध्याच्या घडीला पक्षाची स्थिती येथे नाजूक असून पक्ष बळकटीकरणासाठी कोणतेच प्रयत्न झालेले नाही. येथील गटातटाच्या राजकारामुळे काँग्रेसचे प्रचंड नुकसान झाले असून ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त्या झाल्या त्यांनी फक्त आपला आणि दुसऱ्या गटाला मोठे करण्याचे काम केलं आहे. तर पक्षांतर्गत हेव्यादाव्यामुळेच पक्षाला उभारी मिळू शकलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT