
Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण सध्या ढवळून निघत असून उद्धव ठाकरे गटाला गळती लागली आहे. येथे शिवसेना ठाकरे गटाचे तिन्ही माजी आमदार पक्षाला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत आहेत. यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या ऑपरेश टायगर आणि भाजपच्या ऑपरेश लोटस सध्या रत्नागिरीत सुसाट दिसत आहे. यामुळे जिल्ह्यात आता ठाकरे गटाची मोठी हानी होणार अशा चर्चा रंगल्या असतानाच एका कट्टर शिवसैनिकाचे नाव मात्र राज्यभर चर्चेत आले आहे. तर तालुकाध्यक्ष होताच या शिवसैनिकाने रत्नागिरी तालुक्यात ठाकरे यांच्या शिवसेनाला बुस्टर देण्याचे काम केलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना फोडण्यासाठी शिंदे सेने बळकट करण्यासाठी रणनीती आखली आहे. यासाठी त्यांनी रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण तालुक्यात ऑपरेश टायगर हाती घेतलं आहे. तर अनेक कट्टर शिवसैनिकांना शिंदे सेनेत आणण्याची तयारी केली आहे. याकामात त्यांच्या गळाला ठाकरे गटाचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुभाष बने आणि लांजा राजापूर विधानसभाचे माजी आमदार गणपत कदम शिंदे लागले आहेत. या माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते येत्या काहीच दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
एकीकडे ठाकरे गटाचे हे दोन आमदार शिंदे गटात प्रवेश करत असतानाच लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी देखील ठाकरे यांची साथ सोडली आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. साळवी यांच्या प्रवेशाची तारीख फिक्स झाली आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 3 जानेवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
दरम्यान रत्नागिरी तालुक्यात देखील शिवसेना शिंदे गटाने खेळी करत बंड्या साळवी यांना फोडले. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून आणला. यामुळे मुळ शिवसैनिकांत नैराश्य आले होते. ते देखील आता इतर पक्षांचा रस्ता धरत होते. रत्नागिरीत शिवसेनाला कट्टर आणि विश्वासू चेहरा मिळत नसल्याने शिवसेना अधिकच कमकूवत होत आहे. अशातच होणारे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने तालुक्याची जबाबदारी कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या शेखर घोसाळे यांच्याकडे तालुकाध्यक्षपद दिले आहे.
शेखर घोसाळे यांच्याकडे तालुकाध्यक्षपद येताच येथे शिवसेना उबाठाला बुस्टर मिळाला असून त्यांनी आपल्या कामाला शिवसेना स्टाईलने सुरूवात केली आहे. तर आपण कट्टर आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक असून साळवी स्टॉप येथील शाखेतून कारभार करणार असल्याचे जाहीर केले.
घोसाळे यांच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा शाखा वाद सुरू झाला. तर दोन्ही गट या शाखेवरून आमने-सामने ठाठले. पण नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी शाखेवर आपला दावा सांगत शाखा आपल्या ताब्यात घेतली आहे.
नवनियुक्त तालुक्याध्यक्ष शेखर घोसाळे यांच्या शाखेवर दावा सांगणे तथा तेथूनच कारभार करण्याला सुरूवात केल्याने पक्षाला एक नवी संजीवणी मिळाली आहे. आता घोसाळे यांच्यामुळे तालुक्यातील निष्ठावतं शिवसैनिक शाखेपर्यंत येत असून ते पक्ष कार्यात सहभागी होत आहेत.
राज्यात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आयाराम-गयाराम यांना संधी देण्यात आली होती. येथे विधानसभा निवडणुकीत देखील निष्ठावंताला डावलण्यात आल्यामुळे कट्टर शिवसैनिक बिथरून गेला होता. अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यात रत्नागिरी तालुका प्रमुख बंड्या साळवी यांचा देखील समावेश आहे. यामुळे आता शिवसेनेच काय होणार असा सवाल तालुक्यात प्रत्येक कट्टर शिवसैनिकांच्या मनात घोळत होता.
पण उबाठा शिवसेनेचे वाताहत थांबविण्यासाठी तत्काळ निष्ठावंत शेखर घोसाळे यांची तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे मरगळ भरलेल्या शिवसेनेला उर्जितावस्था आली आहे. बाहेर न पडणारे शिवसैनिक देखील आता पुढे येऊ लागले. पदाधिकारी, कार्याकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली असून कोणत्याही कार्यक्रमान न दिसणारे उबाठाचे पदाधिकारी आता दिसू लागले आहेत. घोसाळे यांच्या निवुक्तीमुळे उबाठाला तालुक्यात बुस्टर मिळाल्याची सध्या चर्चा तालुक्यात रंगली आहे. तर मंत्री उदय सामंत यांच्या ऑपरेशन टायगरला कट्टर शिवसैनिकाने झुंज दिली आहे. घोसाळे यांच्या नियुक्तीमुळे उबाठाला तालुक्यात बुस्टर मिळाल्याचे सध्या जिल्ह्यात बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.