Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : महायुतीला शिंगावर घेणाऱ्या जयंत पाटलांपुढे आता मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचं आव्हान

Islampur Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना घेरण्यासाठी महायुतीकडून 'चक्रव्यूह' रचलं जात आहे. यातच आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचं 'चॅलेंज' जयंत पाटील यांच्यासमोर असणार आहे.

Akshay Sabale

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनेक आव्हानं पेलत पक्षाला उभारी देण्याचं काम केलं. तसेच, वेळोवेळी महायुतीतील भाजप, शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादीला काँग्रेस ( अजितदादा पवार ) शिंगावर घेण्याचं कामंही जयंत पाटील करतात. मात्र, विधानसभेच्या तोंडावर बालेकिल्ल्यात अर्थात इस्लामपुरात जयंत पाटील यांच्यासमोर नवं चॅलेंज समोर राहिलं आहे. तेही महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचं.

इस्लापुरात जयंत पाटील यांना पाठिंबा न देता स्वबळावर लढण्याची वक्तव्ये काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याला कारण ठरतंय इस्लामपुरातील काँग्रेस कमिटीचं कार्यालय. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस कमिटीच्या नावे असलेल्या इमारतीचा ताबा जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांच्या पक्षाकडे ठेवला आहे. ही जागा काँग्रेस पक्षाला परत केली, तरच पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीत त्यांचा प्रचार करतील, असा इशारा काँग्रेसनं दिला आहे.

इस्लामपूर येथील शासकीय विश्रामगृहात पक्षनिरीक्षक आणि आंध्र प्रदेशचे माजी मंत्री साके शैलजाथ आणि सहनिरीक्षक शशांक बावचकर यांनी वाळवा तालुक्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेतला. या बैठकीत काँग्रेसला स्बवळावर लढण्याची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

याच बैठकीत काँग्रेस (Congress) कमिटीची जागा आणि इमारतीचा विषय गाजला. अनेक वर्षांपासून काँग्रेस कमिटीच्या नावे असलेल्या इमारतीचा ताबा जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाकडे ठेवला आहे.

काँग्रेस पक्षाची जागा आणि इमारत काँग्रेसकडे सुपूर्द करावी. तर, विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेऊ, अशी आक्रमक भूमिका काँग्रेस पक्षानं घेतली. त्यामुळे आगामी काळात जयंत पाटील विरुद्ध काँग्रेस, असा संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT