Congress Vs Ncp News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress Vs Ncp : ''राष्ट्रवादी भाजपाची लव्हर..''; काँग्रेस नेत्याचं भरसभेत वादग्रस्त विधान

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला मदत करत आहे.

सरकारनामा ब्यूरो

संभाजी थोरात

Karad News : नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. अजित पवारांनी आघाडीतील वाद चव्हाट्यावर आणले असा खळबळजनक दावा देखील पटोलेंनी केला आहे. यावरुन आऱोप प्रत्यारोपांनी राजकारण तापण्याची शक्यता असतानाच काँग्रेसच्या नेत्यानं भरसभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री सतेज पाटलांसमोर वादग्रस्त विधान केलं आहे.

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कराड येथे हाथ से हाथ जोडो अभियानाची सुरवात करण्यात आली यावेळी बाईक रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, ऍड. उदयसिंह पाटील उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस प्रदेश सदस्य अजित पाटील चिखलीकर यांनी इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच कव्हर आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाची लव्हर अशी टीका राष्ट्रवादीवर केली आहे. या टीकेनंतर पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी (Ncp) त नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

अजित पाटील चिखलीकर यांनी यावेळी बोलताना भाजपावर जोरदार टीका केली. चिखलीकर म्हणाले, भाजपामुळ देश अडचणीत आला आहे. काँग्रेसची सत्ता असताना ईडी, सीबीआय या संस्था होत्या. मात्र, त्याचा कधीही गैरवापर केला नाही. आता विरोधी पक्ष संपवण्यासाठी सध्या या संस्थाचा वापर केला जात आहे. लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसची गरज असल्याचं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला मदत करत असल्याचा आरोपही अजित पाटील चिखलीकर (Ajit Patil Chikhalikar) यांनी यावेळी केला आहे.

तांबे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणण्याचे काम....

अजित पवार यांनीच तांबे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणण्याचे काम केलं. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आमच्यावर टीका केली. तांबे यांच्या उमेदवारीबाबत बाळासाहेब थोरात, तसेच माझ्याशी बोलल्याचे अजित पवार सांगत होते. आता पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मते आम्ही मारली असे म्हणत आहेत. या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये आम्हाला फसायचं नाही असं नाना पटोले म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT