Sanjay Raut News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जपा असं आवाहन केलं आहे. याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील कसबा,चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहिलं आहेत.
याच पार्श्वभूमीवर कसबा,चिंचवड या दोन्हीही पोटनिवडणुका बिनविरोध होणार का? महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाही असं स्पष्ट करतानाच भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. आम्ही कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत सर्व्हे केला असून दोन्ही मतदारसंघातील लोकांना निवडणूक हवी आहे. मतदारांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे कुणी कितीही फोन केले आणि राज ठाकरेंनी नेहमीप्रमाणे पत्र लिहिलं असलं तरी कसबा, चिंचवड पोटनिवडणुका होणारच असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच दोन्ही मतदारसंघातील वातावरण सरकारसाठी अनुकूल नाही. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत जनतेने त्यांच्या मनात काय आहे? हे दाखवून दिले आहे. त्यामुळे सरकारच्यावतीने पराभवाच्या भीतीनं ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विधान परिषदेप्रमाणे या दोन्ही पोटनिवडणुकीत वेगळा निकाल लागेल असं सरकारला वाटतं असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत.
...सर्वात आधी घाणेरड्या राजकारणाची सुरुवात कुणी केली ?
महाराष्ट्रात सर्वात आधी घाणेरड्या राजकारणाची सुरुवात कुणी केली. राजकारण गढूळ कुणी केलं? सुडाचं राजकारण कुणी सुरु केलं असा सवाल उपस्थित करतानाच यावरही चिंतन व्हायला हवं. तसेच देवेंद्र फडणवीस मागं म्हणाले होते, राजकारणातील कटूता कमी करण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण त्यांचं एकही पाऊल याबाबत पडलेलं दिसत नाही अशी टीकाही राऊतांनी यावेळी केली.
याबाबत राज्यातील जनतेला संभ्रम आहे. कसबा-चिंचवडसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. कसब्याची जागा काँग्रेस लढविणार होती, त्याप्रमाणे त्यांनी उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना चिंचवडच्या जागेबाबत आग्रही आहे. त्याबाबत मविआ लवकरच निर्णय घेईल असंही राऊत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.