Uddhav Thackeray, Balasaheb Thorat, chandrhar patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024: सांगलीच्या जागेवर काँग्रेस ठाम, बाळासाहेब थोरात म्हणाले; चर्चेतून प्रश्न मिटतील पण...

सरकारनामा ब्युरो पश्चिम महाराष्ट्र, सरकारनामा ब्युरो

Sangli Lok Sabha Election 2024: देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय पक्षांची धावपळ सुरु आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने (MVA) काही लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha constituency) उमेदवार अद्याप जाहीर केले नाहीत. काही जागांवरुन महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. तर महाविकास आघाडीतही तिच परिस्थिती आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला नसला तरी दोन्हीकडील नेत्यांनी मात्र ठराविक जागेवरती आपला उमेदवार कोण असणार हे जाहीर केलं आहे.

अशीच एक जागा आहे सांगलीची या जागेवरुन महाविकास आघाडीत वाद सुरु आहे. एकीकडे सांगली (Sangli) काँग्रेसचा बाल्लेकिल्ला असल्यामुळे ती जागा आम्हाला मिळावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगलीतील भरसभेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (chandrhar patil) हे सांगलीतून शिवसेनेचे उमेदवार असल्याचं जाहीर केलं आहे. ठाकरेंच्या याच भूमिकेमुळे काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट वादाला तोंड फुटलं आहे. अशातच काँग्रेसचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगलीच्या जागेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आघाडीतील जागा वाटपाबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना थोरात म्हणाले; फक्त महाविकास आघाडीतच (MVA) नव्हे तर महायुतीतही जागावाटपाचा तिढा सुरू आहे. आमच्याकडे फक्त तिढा आहे, तिकडे मात्र अनेक तिढे आहेत. आमचे सर्व तिढे सुटतील आणि आम्ही एकजुटीने काम करू. चर्चेतून प्रश्न मिटतील, पण आम्ही आजही सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहोत, असं थोरातांनी सांगितलं. थोरात यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसने सांगलीच्या जागेवरचा आपला दावा कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. तर ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवार जाहीर करुन टाकलं आहे. त्यामुळे आता माघार नेमकं कोण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आघाडीसोबत येणार का या प्रश्नावरही थोरातांनी भाष्य केलं आहे. थोरात म्हणाले, "प्रकाश आंबेडकर आघाडीतून बाहेर पडलेले नाहीत. चर्चा सुरू असून वरिष्ठ मार्ग काढतील. वंचित आघाडीत असावी अशी माझी इच्छा आहे. महाराष्ट्रात आघाडीला आणि देशात इंडिया आघाडीला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे अपेक्षा वाढणे साहजिक आहे. या सर्वातून लवकरच मार्ग निघेल."

(Edited By - Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT