Madha Lok Sabha News: जानकरांचा ‘यू टर्न’, माढ्यावर अभयसिंह जगतापांचा दावा; आघाडीत नवा ट्विस्ट

Madha Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीचे माढ्यातील संभाव्य उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ऐनवेळी पलटी मारून पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा हाती घेतला आहे.
Sharad Pawar, Mahadev Jankar, Abhaysingh Jagtap
Sharad Pawar, Mahadev Jankar, Abhaysingh JagtapSarkarnama
Published on
Updated on

Madha Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे (MVA) माढ्यातील संभाव्य उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी ऐनवेळी पलटी मारून पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा हाती घेतला आहे. जानकर महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे आता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याबाबतच्या चर्चांना उधान आलं आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप (Abhaysingh Jagtap) यांनी माढा मतदारसंघावर दावा केला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Constituency) आमचे नेते शरद पवार (Sharad Pawar) मला शंभर टक्के उमेदवारी देतील असा मला विश्वास आहे. 'गेल्या सहा महिन्यांपासून मतदार संघातील लोकांशी मी संपर्कात आहे. लोकांकडूनही मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे.' असे म्हणत जगताप यांनी माढ्याच्या जागेवर दावा केला आहे. दरम्यान, येत्या 28 मार्च रोजी म्हसवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. जगताप आज पंढरपुरात (Pandharpur) आले होते यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उमेदवारीबाबत भूमिका मांडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जानकारांना एक जागा मिळणार

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) हे महाविकास आघाडीमध्ये सामिल होणार आणि माढ्यातून ते निवडणूक लढवणार अशा चर्चांना उधान आलं होतं. शरद पवार माढ्यातून (Madha) जानकर यांनाच उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झाले होतं. यासाठीची चाचपणी देखील केली जात होती. शरद पवार यांच्याकडून जानकरांच्या नावाचा विचार चालू झाल्यानंतर महादेव जानकर यांनीदेखील हालचाली सुरू केल्या होत्या. इतकेच नव्हे तर जानकारांनी भाजपचे नाराज नेते मोहिते पाटील आणि अजित दादांच्या गटातील संजीवबाबा निंबाळकर यांची भेट घेतली होती. पण आज पुन्हा एकदा जानकरांनी महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. युतीमध्ये जानकरांना लोकसभेची एक जागा देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. जानकर यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Sharad Pawar, Mahadev Jankar, Abhaysingh Jagtap
Satara Lok Sabha Election: उदयनराजेंना ताटकळत ठेवणं, हा सातारच्या गादीचा अपमान; सुळेंचा भाजपवर घणाघात

उमेदवार जाहीर पण नाराजी कायम

माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार हे निश्चित झालं आहे. भाजपच्या पहिल्या 20 उमेदवारांच्या यादीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माढा मतदारसंघातील उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. भाजपचा उमेदवार ठरला असला तरी महायुतीमधील मित्र पक्षांचा निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध आहे. फलटणचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तर आपली नाराज जाहीर केली आहे. रामराजेंची समजूत काढण्यासाठी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली तरीही तोडगा निघाला नाहीये. त्यामुळे महायुतीपुढे मित्रपक्षांची समजूत कशी काढायची हा प्रश्न आहे. तर आघाडीच्या नेत्यांना माढ्यात उमेदवार कोण द्यायचा हा प्रश्न पडला आहे.

(Edited By Jagdish Patil)

Sharad Pawar, Mahadev Jankar, Abhaysingh Jagtap
Lok Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा धक्का; महादेव जानकरांचा ‘यू टर्न’, महायुतीसोबत राहण्याचा निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com