Rahul Patil, Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

करवीरच्या मैदानात स्वतः बंटी पाटीलच उतरले, काँग्रेस निष्ठावंताची फौज उभा करत राहुल पाटलांना थेट इशारा

Satej Patil Reacts on Rahul Patil Join to NCP : दिवंगत आमदार पी.एन.पाटील शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. पण आता बदलत्या राजकारणामुळे त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी वेगळा निर्णय घेतला आहे.

Rahul Gadkar

  1. राहुल पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या महायुती प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत.

  2. सतेज पाटील यांनी काँग्रेस निष्ठावंतांची मेळावे घेत थेट राहुल पाटील यांना इशारा दिला आहे.

  3. पी.एन. पाटील यांच्या निधनानंतर करवीर विधानसभा काँग्रेससाठी पोरकी होणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Kolhapur News : गेली अनेक दशकं काँग्रेस सोबत दिवंगत आमदार पीएन पाटील निष्ठावंत होते. पण आता त्यांचा गट आणि त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. ते या महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून पी एन पाटील गटाला ओळखले जाते. राजकारणातील अनेक चढ-उतारात देखील काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहिल्याने आज देखील या गटाला निष्ठावंत म्हणूनच ओळखले जाते. मात्र दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या निधनानंतर राजकीय वारसदार ठरलेले राहुल पाटील हे विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत पक्षप्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यासंदर्भातील चर्चा केली आहे. काँग्रेससाठी पोरका होणाऱ्या करवीर विधानसभा मतदारसंघात आता सतेज पाटीलच मैदानात उतरलेत. पक्षप्रवेशापूर्वी निष्ठावंतांची मेळावे घेत थेट राहुल पाटील यांनाच इशारा दिला आहे. (Ajit Pawar’s Meeting with Rahul Patil Sparks Political Shifts in Kolhapur’s Karveer Constituency)

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी करवीरमध्ये अधिक लक्ष घातले आहे. या विधानसभा मतदारसंघात येणारे सहा जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात आतापासूनच सूत्रे हातात घेताना दिसत आहेत. राहुल पाटील यांचा पक्ष प्रवेश होऊ नये यासाठी समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तसेच राहुल पाटील यांनी पक्षप्रवेश केला तर निष्ठावंत कार्यकर्ता हा काँग्रेस विचारापासून दूर जाऊ नये यासाठी सतेज पाटील अधिक मेहनत घेताना दिसत आहेत. मागील दोन दिवसांच्या कालावधीत त्यांनी निष्ठावंत काँग्रेस विचारांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

अडचणीच्या काळात या मतदार संघात पाटील यांनी काँग्रेस उभी केली. काँग्रेस विचारांसोबत जगलेला हा गट राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी सोडू नये. अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत करवीरमधून लढाई लढावी लागेल असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी दिला आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघात पाटील विरुद्ध पाटील गटाचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी करवीर मधील शिये, वडणगे आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यापूर्वी करवीर मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

याच बैठकीच्या माध्यमातून काँग्रेस विचारांचा कार्यकर्ता आपल्या सोबत कसा राहील? या संदर्भात विचार मंथन झाले. त्यातच गेल्या दहा वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून गोकुळ, जिल्हा परिषद, महापालिका, बाजार समिती, जिल्हा बँक या सर्व प्रमुख संघांवर वर्चस्व ठेवले होते. शिवाय जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार देखील सतेज पाटील यांच्यासोबत होते. मात्र महायुती सत्तेत आल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील एकाकी पडलेत. अशावेळी राहुल पाटील यांनी पाटलांची साथ सोडणं हे अनेक कार्यकर्त्यांना न पटलेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदची निवडणूक देखील आता तितकीच महत्त्वाची प्रतिष्ठेची समजली जाते.

FAQs :

1. राहुल पाटील महायुतीत प्रवेश करणार का?
होय, त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे ही शक्यता वाढली आहे.

2. काँग्रेसकडून करवीर मतदारसंघाची जबाबदारी कोणाकडे आहे?
सतेज पाटील यांनी काँग्रेस निष्ठावंतांची बैठक घेऊन नेतृत्वाचे संकेत दिले आहेत.

3. राहुल पाटील यांनी काँग्रेस का सोडली?
त्यांच्या संभाव्य पक्षांतरामागे राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याची शक्यता वाऱ्यावर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT