Rahul Patil: काँग्रेस निष्ठावंतांचे पुत्र हाती घड्याळ बांधणार, करवीरचे राहुल पाटील राष्ट्रवादीत?

Congress leader Rahul Patil to join NCP:राहुल पाटील यांच्यासह कारखान्याच्या सर्व संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा. राष्ट्रवादी सध्या सत्तेत आहे. त्यामुळे कारखान्यासह इतर विकासकामांनाही गती देता येईल, अशी चर्चाही झाली.
Rahul Patil
Rahul PatilSarkarnama
Published on
Updated on

✅ ३ महत्वाचे मुद्दे

  1. राहुल पाटील भाजप नव्हे, राष्ट्रवादीच्या वाटेवर: काँग्रेसमध्ये असलेले राहुल पाटील भाजपऐवजी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता आहे.

  2. भोगावती साखर कारखान्याची आर्थिक अडचण: भोगावती सहकारी साखर कारखान्याला एनसीडीसीकडून मंजूर कर्जासाठी राज्य सरकारची हमी आवश्यक आहे.

  3. राजकीय हालचाली मागील उद्दिष्ट: राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यास कारखान्यासह इतर विकासकामांना गती मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवले.

Kolhapur News: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरू होती. मात्र काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून झालेला विरोध पाहता राहुल पाटील आता भोगावती सहकारी साखर कारखान्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

भोगावती सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) मंजूर झालेल्या कर्जासाठी महाराष्ट्र सरकारने हमी द्यावी, या मागणीसाठी गेलेल्या राहुल पाटील यांच्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केल्याची देखील चर्चा जोरात सुरू आहे.

करवीर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात 2000 इतक्या कमी मतांनी पराभूत झाले होते. सध्या राहुल पाटील यांचे नेतृत्व असणारा भोगावती साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून भोगावती कारखान्याला कर्ज मंजूर झाले आहे. मंजूर झालेल्या कर्जाला राज्य सरकारची हमी घेणे बंधनकारक आहे.

Rahul Patil
Uddhav Thackeray: दाढीवरुन हात फिरवणाऱ्यांची लोक बिन पाण्याची करतील; ठाकरे ब्रॅण्ड संपवण्याची प्रयत्न करणारे बाहेर बँण्ड वाजवीत फिरताहेत!

एनसीडीसीकडून साखर कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही; तर हे कर्ज राज्य सरकारकडून वसूल केले जाते. यासाठी ही हमी घेणे बंधनकारक केले आहे. सध्या कारखान्याला उभारी देण्यासाठी कर्जाची आणि राज्य सरकारच्या हमीची गरज आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी राहुल पाटील, भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला गेले होते.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुल पाटील यांच्यामध्ये कर्जाच्या हमीची चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबतही चर्चा झाली. राहुल पाटील यांच्यासह कारखान्याच्या सर्व संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा. राष्ट्रवादी सध्या सत्तेत आहे. त्यामुळे कारखान्यासह इतर विकासकामांनाही गती देता येईल, अशी चर्चाही झाली.

Rahul Patil
Maharashtra Politics: वाचाळ नेते अन् खालावलेले राजकारण; घसरलेल्या संवादात जनतेचे हरवलेले प्रश्न, हीच महाराष्ट्राची ओळख?

मात्र, राहुल पाटील यांनी यावेळी आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. दरम्यान, कारखान्याला शासनाकडून हमी मिळावी, यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आहे. याला शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे

प्र1: राहुल पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत?
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची शक्यता आहे.

प्र2: भोगावती कारखान्याला कोणते कर्ज मंजूर झाले आहे?
एनसीडीसीकडून कारखान्यासाठी कर्ज मंजूर झाले आहे.

प्र3: कर्जासाठी राज्य सरकारची भूमिका काय आहे?
राज्य सरकारने हमी दिली तरच कर्ज वितरित होईल.

प्र4: अजित पवारांनी राहुल पाटील यांना काय सुचवले?
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास विकास कामांना गती मिळेल असे सुचवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com