Rajvardhan Kadambande news Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajvardhan Kadambande: कदमबांडे यांना आत्ता येण्याची वेळ का आली? सतेज पाटलांनी थेट सांगितले...

Kolhapur Politics News: मुख्यमंत्री कोल्हापुरात बसले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांना विरोध ते का करत आहेत? असा सवाल सतेज पाटील यांनी केला.

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur News: "आमदार राजवर्धन कदमबांडे (MLA Rajvardhan Kadambande) एका बाजूला म्हणतात, आमचा हा घरगुती विषय,आमचं आम्ही बघून घेऊ. मात्र कदमबांडे यांना आत्ताच कोल्हापूरमध्ये येण्याची वेळ का आली. मुळात भाजपने त्यांना अगदी खास विमान पाठवून, चार्टर विमान पाठवून त्यांना आणण्याची वेळ आली. भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मुद्दा त्यांच्याकडे कुठलाही राहिलेला नाही. म्हणून जुना कुठला तरी विषय उकरून काढायचा आणि लोकांची दिशाभूल करायची हे काम भाजपचे सुरू आहेत," असा आरोप काँग्रेसचे नेते, आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई असतील या महामानवांबद्दल नकारात्मकता बनवून इतिहास बिघडवायचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केला. ते कोल्हापूर गांधी मैदान येथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेनिमित्त पाहणीदरम्यान आल्यानंतर बोलत होते.

"छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा विचार दिल्लीत पोहोचला पाहिजे ही सामान्य माणसाची विचारधारा आहे. मात्र, मुख्यमंत्री सर्व सोडून कोल्हापुरात बसले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांना विरोध ते का करत आहेत? असा सवाल सतेज पाटील यांनी केला. "जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. जनता सूज्ञ आहे," अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात होत असलेल्या सभावरून बोलताना, महाराष्ट्राबद्दल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला कॉन्फिडन्स नाही. म्हणूनच पाच टप्प्यात या निवडणुका घेतल्या जात आहेत. निवडणूक होईपर्यंत अजून दहा वेळा पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येतील, अशी चर्चा आहे, असा टोला सतेज पाटलांनी लगावला.

राज्यातील नेत्यांवर कॉन्फिडन्स राहिला नाही, राज्यातील नेतृत्व यश आणण्यास कमी पडत आहेत. ही खात्री झाल्यानेच मोदी महाराष्ट्रात आहेत. मात्र, ते आले तरी काही फरक पडणार नाही. महागाई, बेरोजगारी आणि घटना बदलण्यासंदर्भात भाजपच्या नेत्यांची वक्तव्यं यामुळे जनतेचा कौल महाविकास आघाडीसोबत असल्याचा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT