Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर उत्तरचा महाविकास आघाडी फॉर्म्युला बंटी पाटलांनीच केला उघड!

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे राजकारण तापू लागले आहे.

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर (Kohapur North) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. येथील उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेत (Shivsena) वाद सुरू होता. अखेर ही जागा काँग्रेसचे (Congress) दिवंगत माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना मिळाली आहे. या जागेसाठी आग्रही असललेले काँग्रेस नेते व पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनीच आता महाविकास आघाडीचा या जागेचा फॉर्म्युला उघड केला आहे.

पाटील म्हणाले की, याआधी ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या, तिथे ज्या पक्षाचा उमेदवार होता, त्याच पक्षाने निवडणूक लढवला. कोरोनामध्ये अनेक नातेवाईक सोडून गेले, यात चंद्रकांत जाधव यांचाही समावेश आहे. कोरोना काळात त्यांनी लोकांना दिलासा देण्याचे काम केले पण, त्यांचे काम अपूर्ण राहिले, हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी आता जयश्री जाधव यांच्यावर आहे. कोल्हापूर उत्तरची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय घेतला आहे. त्यावर ठामपणे काम करण्याची सर्वांचीच भूमिका आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्षांना एकत्र घेऊन या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी केशवराव भोसले नाट्यगृहात महाविकास आघाडीचा मेळावा झाला. या वेळी मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुरेश साळोखे, राजेश लाटकर आदी उपस्थित होते.

उमेदवार जयश्री जाधव म्हणाल्या की, मी राजकारणात यायचे नाही असेच ठरवले होते. पण लोकांचा विश्‍वास आणि प्रेमाने मला गप्प बसू दिले नाही. पालकमंत्री सतेज पाटील यांनी मला भावाप्रमाणे साथ दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भेटायला आले, त्यावेळी त्यांनी तुम्ही भाजपच्या आहात आणि भाजपमूधनच पोटनिवडणूक लढा, असे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांनी मन मोठे करायला हवे होते. पण तसे घडले नाही. चंद्रकांत जाधव यांनी हाती घेतलेला झेंडा अर्ध्यावर सोडायचा नाही म्हणून रिंगणात उतरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT