कोल्हापुरात पहिल्या महिला आमदार निवडून आणण्यासाठी मुश्रीफ उतरले मैदानात

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे राजकारण तापले आहे.
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. काँग्रेसचे (Congress) दिवंगत माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) या महाविकासआघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कंबर कसली आहे. कोल्हापुरातून पहिल्या महिला आमदार म्हणून जयश्री जाधव या निवडून जातील, असा निर्धार मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी केशवराव भोसले नाट्यगृहात महाविकास आघाडीचा मेळावा झाला. या वेळी मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुरेश साळोखे, राजेश लाटकर आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सामान्यांना आधार देण्यासाठी चंद्रकांत जाधव यांनी परिश्रम केले. ते पाच वर्षे काम करणार होते पण त्यांना काम करता आले नाही. त्यांचे उरलेले काम आता जयश्री जाधव पूर्ण करतील. यासाठी त्यांचे लाखो भाऊ त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता जाधव यांना पाठबळ दिले आहे. त्यांना विजयी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. काही चुकीचे घडल्यास त्याचा कमीपणा मुख्यमंत्र्यांना येऊ शकतो. भाजपने मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवरील टीका केली असून त्यांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे.

Hasan Mushrif
बंटी पाटील अर्धी लढाई जिंकले; कोल्हापूर उत्तरचा काँग्रेसलाच मान

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक बिनविरोध करून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रद्धांजली वाहूया, अशी विनंती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून केली होती. पण त्या दोघांनीही दाद दिली नाही. भाजपने ही पोटनिवडणूक लादली असून, कोल्हापूर शहर हे भाजप धार्जिणे नाही हे दाखवण्याची वेळ आली आहे. जयश्री जाधव या शहरातील पहिली महिला आमदार म्हणून विजयी होतील, आणि दिवंगत आमदार जाधव यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करतील, असा असेही पालकमंत्री पाटील व ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com