Kolhapur Loksabha
Kolhapur Loksabha  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

P.N. Patil ON Bajirao Khade: पक्षाकडे न मागताच उमेदवारी कशी मिळेल, पी. एन. पाटलांनी खाडेंना सूनावले

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur News: काँग्रेसची उमेदवारी दिल्ली, मुंबईत ठरते, त्यासाठी काही प्रक्रिया आहेत. पक्षाकडे अर्ज करावा लागतो. त्याची २५ हजार रुपये वर्गणी भरावी लागते. हे न करताच उमेदवारी कशी मिळेल? असा सवाल करत काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील (MLA P.N.Patil) यांनी, बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पूर्वी केला होता. पण त्यांनी कोणाचेच ऐकले नाही, असा खुलासा पाटलांनी केला. खाडे (Bajirao Khade) यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर स्थानिक पातळीवरही आपल्या उमेदवारीची दखल न घेतल्याचा आरोप केला होता, त्याला पाटील यांनी उत्तर दिले.

पक्षाच्या उमेदवारीचा निर्णय दिल्ली, मुंबईतून होतो. ज्यावेळी खाडे यांचे शिष्टमंडळ मला किंवा अन्य नेत्यांना भेटले त्यावेळीच त्यांना दिल्लीत जाऊन उमेदवारी मागणी करण्याचा सल्ला दिला होता. काँग्रेसला जागा मिळाली तरी सुरुवातीला पक्षाकडे उमेदवारच नव्हता. त्यावेळी त्यांनी उमेदवारी आणलीअसती, तर आम्ही त्यांच्यासोबत राहिलो असतो. पक्षाची विधानसभेची उमेदवारी मिळवायची असेल, तर १५ हजार व लोकसभेसाठी २५ हजार वर्गणी भरून अर्ज करावा लागतो. ही प्रक्रिया खाडे यांनी केलेली नाही, मग त्यांना उमेदवारी कशी मिळेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, 'त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, पक्षाचे निरीक्षक आबा दळवी आदींनी केला. अर्ज माधारीच्या दिवशीही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचा फोनच बंद होता. म्हणून बाजार समितीचे सभापती भारत पाटील- भुयेकर यांच्यासह अन्य काही प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ते भेटले नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचा खाडे यांचा आरोप चुकीचा आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT