Karad APMC Result sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad APMC Result: काँग्रेस की राष्ट्रवादी-भाजप युती; कल थोड्याच वेळात समजणार

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad APMC Result News: कऱ्हाड (जि.सातारा) येथील शेती उत्पन्न बाजार समितीसाठी काल (रविवारी) मोठ्या चुरशीने ९७.१९ टक्के मतदान झाले. या निवडणुकीमुळे कऱ्हाड तालुक्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणीस आज सोमवारी सकाळी प्रारंभ झाला असुन मतदारांचा कौल कोणाला काँग्रेस Congress की राष्ट्रवादी NCP भाजप BJP युतीला याचा फैसला थाोड्या वेळात हाोणार आहे.

कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना झाला. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणुक बनली होती. (Bazar Samiti Election Results)

बाजार समितीच्या सोसायटी मतदार गटातील १८९९ पैकी १८४९ मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायत गटातील १९२२ मतदारापैकी १८७७ मतदान कले. व्यापारी गटातील ३७२ मतदारापैकी ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकुण ४१९३ मतदारापैकी ४०७५ मतदारांनी मतदान केल्याने सरासरी ९७.१९ टक्के मतदान झाले. (Political Breaking News)

निवडणूक निरीक्षक तहसीलदार विजय पवार, निवडणुक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांच्या उपस्थितीत मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात सोसायटी गटातील मतांची मोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी सात टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामध्ये मतदारांचा कौल कोणाला मिळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. (Political Short Videos)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT