Karad Bazar Samiti Result: कराडच्या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण मारणार बाजी?

Satara Politics| कराड बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून प्रत्येकी १७ -१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Karad Bazar Samiti Result:
Karad Bazar Samiti Result: Sarkarnama
Published on
Updated on

Karad Bazar Samiti Election Result 2023 : कऱ्हाड येथील शेती उत्पन्न बाजार समितीसाठी आज (30 एप्रिल) मतदान होत आहे. जोरदार राजकीय उलाढाली सुरु आहेत. बाजार समितीची लढाई ही माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड उदयसिंह पाटील-उंडाळकर, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, भाजपचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी महत्वाची मानली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटांनी चांगलीच फिल्डींग लावली आहे. (Who will win in Karad's prestige battle)

आमदार पाटील यांनी बेरजेचे राजकारण करत थेट भोसले गटालाच बरोबर घेतले आहे तर आमदार चव्हाण आणि उंडाळकरांची आपल्या कट्टर समर्थकांवर मदार आहे. त्यामुळे कऱ्हाडची लढत ही प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामध्ये सर्वच नेत्यांनी विजयाचा दावा केल्याने बाजार समित्यांमध्ये कोण कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Karad Bazar Samiti Result:
Bodwad Bazar Samiti Result : शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांना धक्का; खडसे गटाची मोठी आघाडी

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मोठ्या राजकीय उलाढाली झाल्या. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून प्रत्येकी १७ असे ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यासाठी संबंधित पॅनेलच्या नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. बाजार समितीच्या सोसायटी गटात १८६५ मते आहेत, ग्रामपंचायत गटात १९०० मते आहेत, व्यापारी गटात ३७२ मते आहेत. त्यापैकी सोसायटी गटातील ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असुन त्या गटातील विजयावरच पॅनेलच्या विजयाची गणिते ठरणार आहेत.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी पारंपारिक विरोधक असलेल्या भोसले गटालाच थेट मदतीसाठी माजी सहकारमंत्री आमदार पाटील यांनी साद घातली होती. त्यामध्ये भोसले गटानेही आमदार पाटील गटाला मदत केल्याने त्यांचा विजय सुकर झाला. दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या अॅड. उंडाळकर यांनीही आमदार चव्हाण गटाच्या मदतीने बाजार समितीसाठी फिल्डींग लावली आहे. आमदार चव्हाण यांनी पहिल्यांदाच सहकारी संस्थांच्या निवडणुकीत भाग घेतला आहे. त्यांनी निवडणुकीत का भाग घेतला आहे याची कारणे विरोधकांवर टिका करुन मांडली आहेत. तर विरोधी आमदार पाटील व भोसले गटाकडून बाजार समितीतील राजकीय अड्डा उध्वस्त करण्यासाठी निवडणुक लढवत असल्याचे जाहीर केले आहे. (Satara Bazar Samiti Election)

Karad Bazar Samiti Result:
Ner APMC Election Result : पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस गमावले, पण नेरमध्ये मिळवला विजय !

सत्ताधारी आणि विरोधी पॅनेलकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने वातावरण गरम झाले आहे. या निवडणुकीच्या निकालावर भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिकांच्या निवडणुकांची रणनिती ठऱणार आहे. त्यामुळे विजयासाठी दोन्ही गटाच्या नेत्यांनी देव पाण्यात घातले आहेत. जास्तीत जास्त मते आपल्यालाच मिळावी यासाठी आमदार चव्हाण, अॅड. उंडाळकर, आमदार पाटील, भोसले गटाने मोठी फिल्डींग लावली आहे. एका-एका मतासाठी त्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही नेत्यांनी विजयाचा दावा केल्याने निवडणुकीचा गुलाल कोणाच्या अंगावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Karad Bazar samiti)

सत्तेच्या फैसल्यासाठी आज मतदान

बाजार समितीतील सत्तेच्या फैसल्यासाठी आज (३० एप्रिल) मतदान होणार आहे. पहिल्यांदाच बाजार समितासाठी सहा ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी कऱ्हाड तालुक्यातील मसुर, उंब्रज, कोळे, उंडाळे, काले, कऱ्हाड या मतदान केंद्रावर मतदन होणार आहे. त्यासाठी कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com