Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MVA News: सांगलीत काँग्रेस अन् शरद पवार गटाचं शक्तिप्रदर्शन करणार; पण ठाकरेंची दांडी

Political News : स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यासोबतच जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे 5 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थितीत कडेगावमध्ये विधानसभा निवडणुक प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

त्यासोबतच स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi), ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. मात्र, दुसरीकडे पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गैरहजर राहणार आहेत.

कडेगावमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून 5 सप्टेंबरला स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती डॉ. विश्‍वजित कदम यांनी दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

स्व. पतंगराव कदम यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळेच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी शिक्षक दिनाचा मुहुर्त साधण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आदी मान्यवरांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सांगलीत होणाऱ्या या सभेस ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे मात्र जाणार नाहीत. त्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. पण उद्धव ठाकरे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. ठाकरेंना निमंत्रण असलं तरी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते येणार नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. पण सांगलीत लोकसभेतल्या बंडखोरीची सल ठाकरेंच्या मनात आजही कायम असल्याने ते या सभेला जाणार नसल्याची चर्चा आहे.

निवडणुक प्रचाराचे रणशिंग कडेगावमध्ये फुंकणार

यावेळी स्व. पतंगराव कदम यांचे मूळ गाव असलेल्या सोनसळ येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण गुरुवारी करण्यात येणार आहे. यानंतर कडेगावमधील बयाबाई कदम महाविद्यालयाच्या पटांगणात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास सुमारे दोन ते अडीच लाख लोक उपस्थित राहणार असल्याचे समजते, या निमित्ताने महाविकास आघाडी शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT