Ajit Pawar : अजितदादा तिघांना पाठवणार विधान परिषदेत; ‘या’ नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

Governor MLC NCP Mahayuti : राज्यपाल नामनिर्देशित आमदारांबाबतची याचिका मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहेत. त्याचा निकाल लागण्याआधीच नियुक्त्या होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मागील अडीच वर्षांपासून रखडलेली राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन नावांची जोरदार चर्चा आहे. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी या तीन नेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, मुंबै बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि ठाण्याचे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नावांची चर्चा आहे. पक्षाकडून या तिघांच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याचे वृत्त ‘साम टीव्ही’ने दिले आहे.

Ajit Pawar
Nitin Gadkari : …तर पुतळा 100 टक्के कोसळला नसता! गडकरींनी सत्ताधाऱ्यांनाच फटकारलं

यापूर्वीच अजित पवारांकडून विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी विधान परिषदेच्या जागा भरण्याचे सुतोवाच करण्यात आले होते. एकूण 12 जागांपैकी भाजपला सर्वाधिक सहा आणि एनसीपी व शिवसेनेला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे समजते.

राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. त्यावर 1 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत नियुक्ती न करण्याचे आदेश दहा दिवसांपूर्वी कोर्टाने दिले आहेत. मात्र, पुढील सुनावणीला कोर्ट काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar
Sharad Pawar : 'कोल्हापूरकर म्हणतील कोण ह्यो सुक्काळीचा..', पवारांनी 'तो' किस्सा सांगताच एकच हशा पिकला

महाविकास आघाडी सरकारच्या काळात 12 आमदारांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. मात्र, त्यांनी काही नावांवर आक्षेप घेत अनेक महिने या नियुक्त्या केल्या नाहीत. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी सुरू आहे.

विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आचारसंहिता लागू शकतो. त्यामुळे आता बारा आमदारांची नियुक्तीचा निर्णय दीड ते दोन महिन्यांतच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे महायुतीची धावपळ सुरू असून लवकरात लवकर नावांवर शिक्कामोर्तब करून राज्यपालांकडे यादी पाठवली जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com