Khanapur Bazar Commitee Results
Khanapur Bazar Commitee Results  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khanapur Bazar Commitee Results : खानापुरात काँग्रेस-शिवसेनेने भाजपाच्या साथीनं राष्ट्रवादीला धूळ चारली !

सरकारनामा ब्यूरो

Vita News : खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सतरा जागांसाठी शुक्रवारी (दि. २८) ९१.३८ टक्के मतदान झाले होते. विटा येथे तीन व कडेगाव येथे चार मतदान केंद्रं होती. रविवारी(दि.३०) येथील सौ. लीलाताई देश चौगुले प्राथमिक विद्यामंदिरच्या सभागृहात दोन्ही मतदान केंद्रातील मतमोजणीला सकाळी आठला सुरूवात झाली. दुपारी पावणेबाराच्या दरम्यान पहिला निकाल अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील आला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सतरा जागांसाठी शुक्रवारी (दि. २८) ९१.३८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस(Congress)- शिवसेना-भाजप महायुतीची शिट्टी वाजली. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलनं एकतर्फी विजय मिळवत १७ जागा मोठ्या फरकानं जिंकल्या. यापूर्वी एक जागा बिनविरोध झाली आहे.

महायुतीने (Ncp)च्या शेतकरी परिवर्तन पॅनेलला धोबीपछाड दिली. निकालानंतर सत्ताधारी शेतकरी विकास पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आताषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.

सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार भगवान जगन्नाथ नालगे यांनी ७४६ मते घेऊन बाजी मारत विजयाचे खाते उघडले. त्यानंतर सहकारी संस्था गटातील भटक्या विमुक्त प्रवर्गातील निकाल देखील सत्ताधारी गटाच्या बाजूने आला. विजय पंढरीनाथ होनमाने विजयी झाले. त्यांना सर्वाधिक १ हजार ३० मते मिळाली. महिला गटातील निकालाने विजयावर शिक्कामोर्तब झाले. सोसायटी विभागांमध्ये सर्वाधिक ११ जागा होत्या. यातील काही मतपत्रिकेत क्रॉस वोटिंग असल्यामुळे मतमोजणीला थोडा वेळ लागला.

सोसायटी गटातील सर्व ११ जागांवर सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत मोठ्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला. या गटात जवळपास ५९ मते बाद झाली. सत्ताधारी गटातील उमेदवारांना ९६५ ते ८७७ यादरम्यान मते मिळाली. तर विरोधी गटातील उमेदवारांना २५६ ते ३३३ मते मिळाली. ग्रामपंचायत गटात चार जागा होत्या.

सत्ताधारी शेतकरी आघाडीच्या पॅनेलला ६८५ ते ७४३ मते मिळाली. तर विरोधी गटाला २३८ ते २६३ मते मिळाली. व्यापारी गटात विरोधकांनी एक जागा लढवली होती. यामध्ये सत्ताधारी गटाचे महेंद्र कदम आणि अनिल हराळे हे अनुक्रमे ३३८ आणि २८७ मते मिळवून विजयी झाले. विरोधी विकास माने यांना १७२ मते मिळाली. इतर मागासवर्गीय गटात माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख १ हजार २३ मते घेत विजयी झाले.

विरोधी सिद्धेश्वर धावड यांना ३१७ तर प्रसाद लोखंडे यांना ८ मते मिळाली.विजयानंतर सत्ताधारी गटाच्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजपचे झेंडे एकत्रित घेऊन जल्लोष केला.‌

युवा नेते अमोल बाबर यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या विजयाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT