Congress Agitation sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Congress Agressive : भिडेंच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसचा 'रस्ता रोको'

Sambhaji Bhide डॉ. सुरेश जाधव म्हणाले, भिडे यांनी महात्मा गांधींच्या वडीलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचा सातारा काँग्रेसच्यावतीने आम्ही निषेध करत आहोत.

Umesh Bambare-Patil

Satara Congress News : संभाजी भिडेंचा निषेध असो.., काँग्रेस पक्षाचा विजय असो.., संभाजी भिडेंचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय.., महात्मा गांधींचा विजय असो.., अशी घोषणाबाजी करत सातारा जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भिडेंच्या निषेधार्थ काँग्रेस भवनासमोर रस्ता रोको आंदोलन करुन निदर्शने केली. भिडेंना तातडीने अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

काँग्रेसचे Satara Congress जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली भिडेंच्या Sambhaji Bhide निषेधाचे आंदोलन झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवनासमोर रास्ता रोको आंदोलन करत भिडेंच्या विरोधात घोषणा दिल्या.

डॉ. सुरेश जाधव म्हणाले, भिडे यांनी महात्मा गांधींच्या वडीलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचा सातारा काँग्रेसच्यावतीने आम्ही निषेध करत आहोत. अशा पद्धतीची वक्तव्ये करुन समाजात दुही निर्माण करुन लोकांना भडकविण्याचे काम ते करत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदराचे स्थान असून ६०० देशांत त्यांना मानणारे लोक आहेत.

त्यांच्या वडीलांविषयी वक्तव्ये करणाऱ्या व्यक्तींचा आम्ही निषेध करतो. आमचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत अधिवेशनात आवाज उठवून भिडेंना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शासनाने व पोलिसांनी भिडे यांना अटक करावी. अशा मानसिक, विकृत प्रवृत्तीला धडा शिकवावा, अशी आमची मागणी आहे.

या आंदोलनात रणजितसिंह देशमुख, बाळासाहेब शिरसाठ, सुरेश कुंभार, अल्पना यादव, अरबाज शेख, संदीप चव्हाण, धनश्री महाडिक, रफिक शेठ बागवान, मनोजकुमार तपासे, नरेश देसाई, अशोक पाटील, जगन्नाथ कुंभार, प्रताप देशमुख, निवास थोरात, मनिषा पाटील, रजिया शेख, मालन परळकर, नाजिम इनामदार, सुषमा घोरपडे, संभाजी उत्तेकर, तानाजी शिंदे, संदीप माने, यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT