Kolhapur News : कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील पुणे-बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील खराब रस्ताप्रश्नी आणि टोल बंद करावा, या मागणीसाठी काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. त्यासाठी ठिकठिकाणी ठिय्या मारत टोल बंद करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती.
अखेर काँग्रेसच्या (Congress) आंदोलनाला यश आले असून भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने लेखी देत कामा सुरु असल्याच्या कालावधीत सवलत देण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाला पाठवला आहे. येत्या पंधरा दिवसात त्यावर निर्णय होईल, असे कळविले आहे. मात्र या पत्रानंतर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा यापुढे आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही दिला आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी रस्ता चौपदरीकरण सुरू आहे तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शनिवारी जोपर्यंत रस्ता चांगला होत नाही तोपर्यंत टोल बंद ठेवावा, ही मागणी करत टोल वसुली बंद पाडली.
सकाळी साडेनऊ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलन केली टोलनाका येथे झाले. या आंदोलनात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळी दहा वाजल्यापासून काँग्रेसच्या नेत्यांसह दुपारी दोन वाजेपर्यंत टोल वसुली बंद पाडून रस्त्यावर ठिय्या मांडला होता. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. (Kolhapur Congress News)
प्रशासनावर या आंदोलनाचा दबाव पडताच भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाकडून आमदार सतेज पाटील यांना लेखी पत्र देण्यात आले. आपण केलेली मागणी ही केंद्रीय मंत्रालयाशी अधीन असून टोलमध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी, यासाठी आमचा व त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. त्या पंधरा दिवसात रस्त्यांचे काम मार्गी लावण्यात येईल.
सध्या टोलदरामध्ये 25% सवलत आहे. 25% सवलत देण्यासाठी आमचा केंद्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहे. तर किनी टोल नाका 20 किलोमीटर परिघातील गावातील खासगी वाहनांना 100% टोल मध्ये सवलत आहे. पण त्यासाठी मासिक पास घ्यावे लागतील. असेही या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान या पत्रानंतर काँग्रेसकडून आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, आमदार सतेज पाटील यांनी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.