Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंकडून अमित शाह यांच्या टीकेची परतफेड ; म्हणाले, 'अब्दालीचे राजकीय वंशज'

Shivsena vs Bjp News : पुणे येथे 'चला जिंकूया....', अशी गर्जना करीत शिवसेनेचा 'शिवसंकल्प' मेळावा पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली.
Uddhav Thackeray, Amit Shah
Uddhav Thackeray, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Pune News : इतिहासात आपण डोकावून पहिले तर लक्षात येते की, शाहिस्तेखान हुशार होता. त्याचं बोटावर निभावलं. पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. हे परत आले. त्यांनी शहाणपण घेतला नाही. महाराष्ट्राने जे फटके दिले त्याचे वळ कुठे कुठे उठले ते पाहण्यासाठी हे आले होते. त्यांचे मोहरके आले होते. अहमद शहा अब्दालीचे राजकीय वंशज अमित शाह. तोही शाहच होता. तो अहमद शाह होता हा अमित शाह आहे. तो वळवळायला आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवता. तुम्ही नवाज शरीफाचा केक खाणारे तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचे का? अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी करीत अमित शाह यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांची ठाकरेंनी परतफेड केली.

पुणे येथे 'चला जिंकूया....', अशी गर्जना करीत शिवसेनेचा 'शिवसंकल्प' मेळावा पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (Bjp) सडकून टीका केली. “आम्ही काँग्रेससोबत गेलो. तो तुम्ही विश्वासघात केला असल्याने गेलो. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही, असे शंकराचार्य म्हणाले, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Uddhav Thackeray News)

तुम्ही काय करता. तुमचे पूर्वज काढा, 1940 पासून. श्यामाप्रसाद मुखर्जी, तेव्हाच्या मुस्लिम लीगने देशाची फाळणी मागितली. त्यांच्यासोबत मांडीला मांडू लावून बंगालमध्ये सत्ता स्थापन करणारे श्यामाप्रसाद मुखर्जी. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सरकार केले. चंद्राबाबू नायडू हा काय हिंदुत्ववादी माणूस आहे का ? नितीश कुमार हा काय हिंदुत्ववादी आहेत का? असा सवाल करीत त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते. आणि आम्हाला हिंदुत्वाची विचारणा करतात. तुमचं काय आहे ते सांगा?” असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.

Uddhav Thackeray, Amit Shah
Video Uddhav Thackeray : ...म्हणून मला पुणे जिंकायचंय; 'ते' फोटो दाखवत उद्धव ठाकरेंनी पुणेकरांसमोरच विजयाचा नारा दिला!

उद्धव ठाकरे म्हणाले, "आता लढाई मैदानात होणार आहे, हॉलमध्ये नाही. एकतर तू राहशील किंवा मी राहीन, असं मी म्हटलं. काहींना वाटलं त्यांना हे आव्हान दिलं आहे. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे माझा संस्कारिक महाराष्ट्र आहे. तू म्हणजे महाराष्ट्रातील दरेडेखोर टोळक्यांचा अख्खा पक्ष आहे."

फडणवीस यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना ढेकणाची उमपा दिली आहे. तसेच, तू राहूच शकत नाही. तुझा बंदबोस्त करण्यासाठी मैदानात उतरलो आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

Uddhav Thackeray, Amit Shah
Balasaheb Thorat Vs Radhakrishna Vikhe : दहशतीचं राजकारण केल्यास, 'याद राखा'; थोरातांचा विखेंना इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com