Malharpeth Crime News : पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात असल्याच्या कारणावरून पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअरला ओडिसा पोलिसांच्या टास्क फोर्सने अटक केली आहे. तो सातारा जिल्ह्यातील विहे (ता.पाटण) येथील असुन अभिजित संजय जंबुरे असे त्या तरुणाचे नाव आहे. या प्रकारामुळे पाटण तालुका चर्चेत आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अभिजित जंबुरे हा पुण्यातील Pune एका सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होता. यात तो २०१८ पासुन त्याचा पाकिस्तान Pakistan मधल्या काही गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. ओटीपी विक्री आणि शेअरिंग घोटाळ्यात त्याचा सहभाग होता. २०१८ पासून त्याचा हा प्रकार सुरु होता.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील विहे हे त्याचे मुळगाव असुन आई, वडील व बहिण असा त्याचा परिवार आहे. अभिजित हा अविवाहित असून त्याचे वडिलांचे विहे बसथांब्यावर सायकलचा पंक्चर काढण्याचे दुकान आहे. अभिजित हा गेल्या महिन्यात विहे येथे आला होता. तो सामान्य कुटुंबातील असुन आई, वडील अतिशय साधेपणाने राहतात. तर त्याने तूर्तास विहे येथे नवीन दुमजली बंगला बांधला आहे.
त्याच्यावर अशा गुन्ह्यात कारवाई झाल्याने पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान अभिजित यास ओडिसा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने पुणे येथे अटक केली आहे. पुणे न्यायालयातून तीन त्यास दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला ओडिशामधील भुवनेश्वर येथे नेण्यात आले.
अभिजित जंबुरे याने गुजरातमधील आनंदा येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर तो पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होता.काल मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक उत्तम भापकर व त्यांच्या पथकाने विहेतील अभिजित यांच्या घरी जाऊन चौकशी केली.
यामध्ये आम्हाला वरिष्ठांकडून अजुनही कोणत्याही प्रकारची चौकशी करण्याचे आदेश नाहीत. पुण्यातील वृत्ताच्या आधारे तो विहेतील असल्याचे समजल्याने आम्ही विहे येथे जाऊन माहिती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.