India China Dispute : लडाख सीमेवरील भारताची २६ गस्त ठिकाणे चीन घेतली ताब्यात? काँग्रेसचा गंभीर आरोप!

India China Dispute : ...तेव्हा पंतप्रधान विरोधी विधाने का घेतली? काँग्रेसचा सवाल..
India China Dispute : Narendra Modi
India China Dispute : Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

National News : लडाखच्या सीमारेषेवरील (Ladakh Border) ६५ गस्त ठिकाणांपैकी तब्बल २६ गस्त ठिकाणे ही भारताने गमावली आहेत. या गस्तीच्या चिनी घुसखोरांनी ताबा मिळवला असून, या संबंधित २६ ठिकाणी भारतीय लष्कराला जाता येत नाही, अशी संवेदनशील माहिती लेह लडाखच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांच्याकडून देण्यात आली आहे, हा इतका गंभीर विषय असूनही, केंद्र सरकारकडून याबाबत कसलीही भूमिका घेण्यात आलेले नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसकडून केंद्र सरकारवर करण्यात आला आहे. काँग्रेस प्रवक्ते खासदार मनिष तिवारी यांनी हे आरोप केले आहेत. (Latest Marathi News)

India China Dispute : Narendra Modi
Bawankule On Uddhav Thackeray: 'एक हजार टक्के सांगतो आता उद्धव ठाकरेंबरोबर युती नाही'; बावनकुळेंनी स्पष्टं सांगितलं

लडाखमधील चीनच्या घुसखोरीचं वास्तव परिस्थिती केंद्र सरकारकडून लपवून ठेवले जात आहे. यासंदर्भात आता श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे. ते पत्रकार परिषेदेत बोलत होते.

१५ व १६ जूनच्या रात्री चिनी सैनिकांविरोधात झालेल्या धुमश्चक्रित गलावान खोऱ्यात २० भारतीय जवान शहीद झाले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जून रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतगलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केलीच नाही, असे म्हंटले होते. जर असे असेल, चीन घुसखोरी केलीच नसेल, तर मागीव तीन वर्षात भारताने चीनशी एकूण १८ वेळा चर्चा का केली? असा सवाल मनिष तिवारी यांनी केले आहे.

India China Dispute : Narendra Modi
Thackeray Celebrate Gaddar Din: ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नोटीसा; कारण काय...?

काँग्रेसचे केंद्र सरकारला सवाल -

*परराष्ट्रमंत्री एस जयशंकर १७ जून २०२० साली चीनने घुसखोरी केल्याचे मान्य केले होते, मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविरोधी वक्तव्य का केलं?

*देपसांग परिसरात २० ते २५ किलोमीटरचा परिसर हा बफर झोन करण्याची मागणी चीनने केली. यावर सरकारची भूमिका काय?

*इशान्येतील सीमाभागात चीन पायाभूत सुविधा उभी करत आहे. यावर सरकार काय करत आहे?

*संसदेत, स्थायी समिती, सल्लागार समितीमध्ये चीनच्या विषयावर चर्चा झाली का?

*प्रत्यक्ष ताबारेषेवर प्रश्न का उपस्थित केले जाऊ दिले जात नाहीत.

*भारत अमेरिका चर्चेत भारत कचुराई करत असल्याने चीनवर प्रखर भाष्य केले जात नाही, असे अमेरिकन मादी राजदूत केनेथ जस्टर यांनी केली होती. यावर केंद्राची भूमिका काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com