Solapur Bank, Rajendra Raut
Solapur Bank, Rajendra Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur DCC Bank : 'हाय अलर्ट गँग'ला आवरा अन् सोलापूर बँकेची निवडणूक टाळा; राजेंद्र राऊत उतरले मैदानात

प्रशांत काळे

Solapur DCC Bank Scam: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आत्मा असलेली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १३ वर्षांपूर्वी तत्कालीन संचालकांनी डबघाईला आणली होती. त्यानंतर प्रशासकांनी बँक प्रगतीपथावर आणली. तत्कालीन संचालक मंडळाच्या चौकशी पूर्ण होऊन दुसरी चौकशी सहा महिन्यात पूर्ण करावी, तसेच दोषींवर कारवाई करावी असे आदेश उच्च न्यायालय व विभागीय सहनिबंधक भोसले यांनी १८ एप्रिल रोजी काढले आहेत. याबाबत आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Solapur Bank सामान्य शेतकऱ्यांना बिनव्याजी तीन लाख रुपये, पीक कर्ज, ट्रॅक्टर, शेळी, कुक्कुटपालन, गाय, हार्वेस्टर आदींसाठी बँकेकडून कर्ज मिळणे दुरापास्त झाले होते, तर शासकीय बँका शेतकऱ्यांना कागदपत्र तसेच पाहिजे तेवढे कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असत.

साखर, दुधसंघ, सूतगिरणी, हॉस्पीटल या संस्थानिक संचालकांनी बँकेची २००७ ते २०१० या काळात मनमानी कारभार केला. त्यांनी चढाओढ करून बँकेतून कोट्यवधींची किरकोळ तारण, सर्च नाही अशी मोठ्या रकमेची कर्जे उचलली.

२०११ च्या दरम्यान शासन, नाबार्ड, आरबीआय यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यावेळी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते. शासनाचे लागे-बांधे असल्याने चौकशी पूर्ण होण्यास १३ वर्षे अवधी गेला. दरम्यान, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. आता बँकेची निवडणूक लागली पाहिजे म्हणून 'हाय अलर्ट गँग' प्रयत्नशील आहे. सर्व कर्ज वसूल होत नाही तोपर्यंत प्रशासक कामकाज पाहतील. तोपर्यंत निवडणूक नाही, प्रशासकांना मुदतवाढ द्यावी, नाहीतर चौकशीला ब्रेक लागेल. अन्यथा पुन्हा न्यायालयात जाऊ, असा इशारा आमदार राऊत यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT