Gulabrao Patil News : जळगाव बाजार समितीत वर्चस्वासाठी आजी-माजी पालकमंत्री आमने-सामने

Jalgaon APMC Election : उद्या प्रचाराच्या तोफा थंडवणार तर शुक्रवारी मतदान
Gulabrao Patil, Gulabrao Deokar
Gulabrao Patil, Gulabrao DeokarSarkarnama
Published on
Updated on

Gulabrao Patil vs Gulabrao Devkar : जळगाव बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा बुधवारी (ता.२६) शेवटचा दिवस आहे. समितीवर वर्चस्वासाठी विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यात लढत आहे. प्रचारात दोघांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

जळगाव बाजार समितीच्या (Jalgaon APMC Election) संचालकपदासाठी शुक्रवारी (ता.२८) मतदान होत आहे. बाजार समितीत विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सहकार विकास पॅनल तर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल याच्यात लढत आहे.

बाजार समितीत सध्या गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. त्यावेळी भाजप व शिवसेना (उबाठा) सोबत होती. मात्र शिवसेना पक्षफुटीनंतर समिकरण बदलले. भारतीय जनता पक्ष आता गुलाबराव पाटील याच्या शिंदे गटासोबत आहे. तर शिवसेना (उबाठा) गट काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आहेत.

Gulabrao Patil, Gulabrao Deokar
Sangola News : "शेकापचा उमेदवार पाडणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये"

जळगाव बाजार समितीत जळगांव ग्रामीण मतदार संघाचा मोठा भाग आहे. त्यामुळे या मतदार संघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी आमदार व माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाची खरी लढत आहे. पालकमंत्री पाटील यांना बाजार समितीवर सत्ता कायम ठेवण्याचे तर माजी मंत्री देवकर यांना सत्ता काबीज करण्याचे आव्हान आहे. दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचाराचा राळ उठविली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या बैठक दोन्ही गटातर्फे घेण्यात येत आहे.

Gulabrao Patil, Gulabrao Deokar
Pandharpur Politics : अभिजीत पाटलांनी केला भालके-काळेंचा करेक्ट कार्यक्रम; धोत्रेंना गळाला लावत दिला धक्का!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहकार विकास पॅनलतर्फे शेतकरी हिताच्या निर्णयसाठी आम्ही बांधील असल्याचे जाहिर केले. शेतकऱ्यांना बाजार समितीत त्यांच्या मालाला चांगला भाव तसेच त्यांना चांगला सुविधा देण्यात येतील तर उपबाजाार समित्या बळकट करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. तर शेतकरी विकास गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांच्या शेतकरी विकास पॅनलतर्फे गुलाबराव देवकर यांनी बाजार समितीत शेतकरी हिताच्या निर्णयाबरोबरच शेतकऱ्यांना त्यांचा मालाचा दाम ताबडतोब मिळण्यासह इतर चांगल्या सुविधांचीही हमी दिली आहे.

Gulabrao Patil, Gulabrao Deokar
APMC Election : कॉंग्रेसने दिला धोका; मग राष्ट्रवादीनेही उतरवले उमेदवार, अन् महाविकास आघाडी फुटली !

दरम्यान, बुधवारी जळगाव बाजार समितीच्या प्रचारतोफा थंडावणार आहेत. तर शुक्रवारी (ता. २८) मतदान होणार आहे. पालकंमत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनलचा मेळावा मंगळवारी (ता. २५) जळगावात पार पडला. तर गुलाबराव देवकर यांच्या शेतकरी विकास पॅनलचा मेळावा बुधवारी होणार आहे. अंतीम टप्प्यात प्रचाराला वेग आला असून दोन्ही गुलाबरावांनी बाजार समितीत वर्चस्वासाठी कंबर कसली आहे. मतदार कोणाला कौल देणार व कोण बाजी मारणार हे रविवार (ता. ३०) निकालात दिसून येईल. तोपर्यंत आम्हीच विजयी होणार हे दोन्ही गटातर्फे दावा केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com