Corona
Corona Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर जिल्ह्यातील सहाव्या मोठ्या राजकीय नेत्याला कोरोना

शांताराम काळे

अकोले ( जि. अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यां मागे कोरोनाचे शुक्लकाष्ट लागले आहे. जिल्ह्यातील मोठे नेते कोरोना बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील कोरोनाचे उपचार घेत आहेत. अशातच आता भाजपचे आणखी एक नेते कोरोना बाधित आढळून आले आहेत. Corona is the sixth largest political leader in the Nagar district

भाजपचे अनुसूचित जमातीचे राष्ट्रीय मंत्री व तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड ( Vaibhav Pichad ) हे कोरोना संक्रमित झाले आहे. या संदर्भातील माहिती त्यांनीच समाजमाध्यमांना दिली. त्यांना अकोले येथील डॉ. भांडकुली यांच्या रुग्णालयातून मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी हलविले आहे. ते राजूर येथून मुंबईकडे जात असताना त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला.

वैभव पिचड म्हणाले, नगरपंचायत निवडणुकीत सातत्याने मतदारांशी संपर्क साधत असताना माझ्याकडुन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक होते. त्यात त्रुटी राहिल्याने मी आज सकाळी पॉझिटिव्ह निघालो आहे. आज तातडीने राजूर येथील डॉ. बाबासाहेब गोडगे, डॉ.दिघे व अकोले येथील हरिश्चंद्र रुग्णालयात डॉ.भांड कुळी यांचेकडून तपासण्या केल्या आहेत. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मी तातडीने मुंबई येथे जात आहे. माझ्या संपर्कात ज्या व्यक्ती आल्या असतील त्यांनी तातडीने आपली ही तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.

ते पुढे म्हणाले की, अकोले तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन. आपल्यामध्ये परत येऊन पुन्हा तालुक्याच्या प्रश्नात लक्ष घालेल. कोरोना व ओमायक्रोन संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असून प्रत्येकानी आपली व कुटुंबीयांची काळजी घ्यावी. नगरपंचायत निवडणुकीत मला जनतेने दिलेला प्रतिसाद पाहता पुढील चार प्रभांगातील मतदारांनी भाजप मित्र पक्षाच्या उमेदवारांना मदत करून आपले आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

आज (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता वैभव पिचड मुंबईकडे रवाना झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT