Shivaji Kardile and Prajakt Tanpure
Shivaji Kardile and Prajakt Tanpure Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

लोकांसमोर जाता येत नाही म्हणून कोरोनाचे नाटक

सरकारनामा ब्युरो

तिसगाव ( जि. अहमदनगर ) - महावितरण प्रशासन राज्यातील शेतकऱ्यांकडून सक्तीने थकबाकी वसुली सुरू आहे. राज्यातील ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) हे नुकतेच कोरोनातून बरे झाले. या घटनाक्रमाच्या आधारे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांनी त्यांच्या शैलीत टीका केली. ( Corona's play as she can't go in front of people )

माळी बाभूळगाव जिल्हा परिषद गटातील राघो हिवरे, जोहारवाडी, मोहोज, खांडगाव व मांडवे या गावांत सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मोनिका राजळे, सभापती सुनीता दौंड, जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे, संतोष शिंदे, एकनाथ आटकर, प्रवीण परदेशी, कुशल भापसे, बाळासाहेब अकोलकर, धीरज मैड, रवी भापसे, डॉ. साहेबराव नरसाळे, उद्धव गिते आदी उपस्थित होते.

शिवाजी कर्डिले म्हणाले, शेतकऱ्यांकडून डीपीचे पैसे सक्तीने वसूल केले. त्यामुळे लोकांसमोर जाता येत नाही म्हणून ' ते ' कोरोनाचे नाटक करीत असल्याची टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी मंत्री तनपुरे यांचे नाव न घेता केली.

कर्डिले पुढे म्हणाले, की शेतकरी संकटात असतानाही शेतकरीहिताचे निर्णय न घेता वीजमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून वीजबिल सक्तीने वसूल केले. शेतकऱ्यांनीही प्रामाणिकपणाने पैसे भरले. मात्र, पैसे भरूनही मंत्री वीज देत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे.

आमदार राजळे म्हणाल्या, की दुष्काळामध्ये जनावरांच्या चाराछावण्या सगळ्यांत जास्त पाथर्डीत होत्या. म्हणूनच जलयुक्त शिवारमधून पाथर्डी तालुक्यात जादा कामे करण्यात आली. या जलयुक्त शिवार कामांमुळेच गावे पाणीदार झालीत. जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे यांनी मोठ्या खुबीने विविध विकासकामांसाठी मोठा निधी आणला. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

माजी सरपंच सुरेश चव्हाण यांनी प्रास्तविक केले. राजेंद्र दगडखैर यांनी आभार मानले.

नागरदेवळ्याला नगरपालिकेचे गाजर

नागरदेवळे नगरपालिका करण्यासाठी हालचाली होत आहेत. राहुरी नगरपालिकेत शंभर वर्षे झाली पण ड्रेनेज नाही, रस्ते नाही, शौचालय नाही आणि नागरदेवळे ग्रामपंचायत मॉडेल करणार म्हणत आहेत. ज्या गावात रुपयाचा निधी देता आला नाही, त्यांना नगरपालिकेचे गाजर दाखविण्याचे काम मंत्रिमहोदय करीत आहेत. राहुरी नगरपालिकेत काय केले? 1972 मध्ये पाणीयोजना झाली त्यानंतर नवीन योजना केली का? आम्ही 27 कोटी रुपयांची नवीन पाणीयोजना आणली. तिचे श्रेय कर्डिलेंना मिळेल म्हणून तिला स्थगिती दिली, अशी टीकाही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT